डफळापूरची मिसळ पाव,मारामारीची चव सर्वदूर पोहचविणारे महाजन बंन्धू

0

सर्वसामान्य कुटूंबात जन्मल्यानंतर स्वत:च्या व कुटूंबाच्या गरजा भागविण्यासाठी पडेल ते कष्ट करत विविध प्रकारचे लहान मोठे व्यवसाय करत आपल्या अंगभूत हुशारी,कौशल्य,प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर व्यवसाय यशस्वी करून सारी क्षितीजे पार करत यश संपादन केले आहे.परमेश्वर सर्व कार्य आपल्याकडून करून घेत असतो,आपण निमित्तमात्र असतो.अशाच एका अंगमेहनतीने तब्बल ८३ व्या वर्षीही प्रामाणिकपणे हॉटेल व्यवसाय करणारे डफळापूर (ता.जत) येथील हॉटेल रमेशचे मालक महानिंग महाजन यांचा २३ ऑगष्टला ८३ वा वाढदिवस आहे,त्यानिमित्त …

डफळापूरच्या प्रसिद्ध हॉटेल परपरंचा पाया त्यांच्या वडिलांनी घालुन दिला होता.महाजन हॉटेल हे जत तालुक्यातील हॉटेल व्यवसायातील प्रसिद्ध ब्रँड बनला आहे.डफळापूरचा मिसळपाव,मारामारी (चहाचा प्रकार)पेढा ला त्यांनी विशेष ब्रँड बनविला आहे. त्यांच्या स्वादिष्ट पुरीभाजी,मिसळपाव,मारामारी पेढा खाण्यासाठी खवव्याची गर्दी असते.ग्रामीण भागात एखांदा व्यवसाय कसा ग्राहकांच्या प्रसिध्दीस उतरवयाचा याची कला महाजन बंधुना आहे.महानिंग महाजन हे महाजन बन्धूतील प्रगतशील व्यवसायिक आहेत.
त्यांना रमेश व उमेश ही दोन मुले आहेत.

 

दोन्ही मुले हॉटेलचा व्यवसायचा वारसा पुढे चालवत आहेत, हे सर्व वडिलांची पुण्याई व त्याचीच प्रेरणा आहे.असे सर्व जण म्हणतात एकत्र कुटूंब पद्धती व एकमेकांना मदत करत कसं जगायचं हे त्यांच्या कुंटुबाकडून शिकवला मिळते.आज तब्बल ८३ व्या वर्षीही शरीर साथ देत नसतानाही सकाळी हॉटेलमध्ये येऊन काम करतात.विशेष म्हणजे त्यांनी केलेले अपार कष्ट व प्रामाणिक पणामुळे ते डफळापूर परिसरात महानिंग तात्या म्हणून प्रसिद्ध आहेत.

 

शंब्दाकन : राजू माळी

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.