गणेश व्यापारी पतसंस्था जतला‌ आर्थिक वर्षात १ कोटी नफा ; मल्लीकार्जुन इटंगी यांची माहिती        

0
जत,संकेत टाइम्स :  जत येथील गणेश व्यापारी पतसंस्थेची १० सप्टेंबर रोजी सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा  श्री. शिवानुभव संस्था, जत येथे आयोजित करण्यात आली असून,  गतवर्षी लॉकडाऊन ची परिस्थिती असून देखील वसुलीचे योग्य नियोजन,काटकसर, संस्थेचे  संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने जत येथील गणेश व्यापारी पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षांत ढोबळ नफा 1 कोटी व नेट निव्वळ नफा रुपये ५६ लाख झाल्याची माहिती चेअरमन श्री. मल्लीकार्जुन इटंगी (अडत व्यापारी)यांनी दिली.

 

इटंगी म्हणाले, पतसंस्थेने स्वताःच्या नवीन इमारती मध्ये सभासदांना चांगल्या सुविधा व कमीतकमी वेळेत गरजू सभासदांना कर्ज पुरवठा केला आहे. कोरोना काळात ही संस्थेच्या ठेवी ११ कोटी, कर्ज वाटप ११ कोटी‌ केले असून,संस्थेचे एकूण स्वनिधी रुपये 4 कोटी,९३ लाख गुंतवणूक रु. 4 कोटी, एकूण व्यवसाय  २३ कोटी झाला असून, एनपीए  ‘ 0 ‘ टक्के असल्याचे सांगितले.तसेच पतसंस्थेने  आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी बँके प्रमाणे एन ई एफ टी आणि आर टी जी एस  सारख्या रक्कम ट्रान्स्फर करण्याच्या सुविधा चालू केल्याचे सांगितले.
स्थापने पासून ‘अ’ वर्ग  मिळवला आहे. संस्था अखंडित पणे  सभासदांना डिव्हीडंड वाटप करत आली आहे. या वर्षी हि सभासदांना १० टक्के डिव्हीडंड जाहीर केले आहे. यावेळी पतसंस्थेचे  व्हा. चेरमन मोहन माळकोटगी , बसवराज हिट्टी , चंद्रशेखर संख, बसवलिंग कल्याणी, शैलेश ऐनापुरे, सागर बामणे, महिला संचालिका महादेवी काळगी, वर्षाताई संकपाळ, सुलोचना हत्ती व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.