काटामारी विरोधातील आरपारच्या लढाईसाठी सज्ज रहा  : – महेश खराडे

0
बोरगाव,संकेत टाइम्स : शेतकऱ्यांना साखर कारखानदार ,दूध सम्राट ,अडत दुकानदार, दलाल, शासकीय यंत्रणा यासह सर्वच जण लुटत आहेत, शेतकऱ्यांना न लुटणारा तो आळशी  यंदाच्या ऊस हंगामात ऊस वजनातील काटामारी विरोधात आरपार ची लढाई लढू त्या लढाईसाठी सज्ज रहा , असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले
तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी  शाखा अध्यक्ष पदी सुभाष पाटील उपाध्यक्षपदी किरण मोरे खजिनदारपदी युवराज पाटील सचिवपदी कृष्णा ताबवेकर कार्याध्यक्षपदी  संभाजी सुर्यवंशी व उपकार्याअध्यपदी नवनाथ पाटील यांची निवड करण्यात आली तसेच सदस्य पदी रमेश माने बाबुराव मोहिते सुनिल कळसे बाबुराव पाटील बालाजी यादव अनिल पाटील अक्षय मोरे शंकर महाडिक बजरंग गायकवाड सहदेव कदम अतुल माने मानसिक गायकवाड निवास पाटील विकास पाटील आनंदा मोरे विलास गायकवाड गणपती मोरे राजेंद्र पाटील संदिप मोरे अजितकुमार गायकवाड राहुल पाटील सागर पाटील विकी पाटील राहुल गायकवाड विजय कदम आदीची निवड करण्यात आली.
खराडे म्हणाले ,उस उत्पादक शेतकऱ्यांना आज जो उसाचा दर मिळतोय तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळेच मिळतोय, त्यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गेली ३० वर्षे संघर्ष सुरू आहे त्यासाठी आमचे अनेक कार्यकर्ते शहीद झाले आहेत.अनेकांनी तुरुंगवास भोगला आहे अनेकांनी लाठ्या काठ्या खाल्या आहेत त्यामुळे 300 रुपयावपून 3000 दर करण्यात आम्हाला यश आले पण त्याची जाणीव शेतकऱ्यांना नाही याची आम्हाला खंत वाटते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.