जत,संकेत टाइम्स : आंवढी ता.जत येथील रास्तभाव दुकानदाराला रद्द झालेला परवाना कायम ठेवावा,पुन्हा त्यांना दुकान चालविण्याचा परवाना देऊ नये,या मागणीसाठी आंवढी ग्रामस्थांच्या वतीने संरपच आण्णासाहेब कोडग यांच्या नेतृत्वाखालील जत तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. सुमारे २०० नागरिकांनी यात सहभाग नोंदविला आहे.
आण्णासाहेब कोडग म्हणाले,आंवढीतील वादग्रस्त रास्तभाव दुकान चालकांचा भ्रष्ट कारभार समोर आल्याने त्यांच्या दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी रद्द केला होता.विभागीय आयुक्त यांनीही तो निर्णय कायम ठेवत आंवढीतील रेशन दुकान कायमस्वरूपी रद्द करण्याचा निकाल दिला होता.मात्र तत्कालीन राज्यमंत्री यांनी या प्रकरणात रेशन दुकानावरील कारवाईत दुकान रद्द करण्या सारखा प्रकार घडलेला नाही.त्यामुळे त्यांचे दुकान रद्द करण्याचा निर्णय बदलून पुन्हा त्यांना दुकान चालविण्यास देण्याचा निकाल दिला होता.त्यामुळे आमचे म्हणणेही ऐकून घेतले नव्हते,असेही कोडग म्हणाले.
सामान्य जनतेचे धान्य या दुकानदाराकडून हडप करण्याचे प्रकार घडलेले आहेत.त्यामुळे त्यांना पुन्हा दुकान चालविण्याची परवानगी देण्यात येऊ नये,या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आल्याचे कोडग यांनी सांगितले.
जत तहसील कार्यालयासमोर आंवढी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.