लिंगायत समाजात ऐक्याचा एल्गार पुकारणे काळाची गरज : आमदार डाॅ.विनय कोरे पुढाकार घेणार

0

डाॅ.बसवराज बगले यांची लिंगायत संपर्क मोहीम…!

वारणानगर :  महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या सर्व घटकांमध्ये ऐक्याचा एल्गार पुकारणे ही काळाची गरज आहे,त्यासाठी राज्यव्यापी दौरा करण्याचा मनोदय वारणानगरचे आमदार डाॅ.विनय कोरे सावकार यांनी व्यक्त केला.

 

लिंगायत समाजातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बसवराज बगले यांनी रविवारी जनसुराज्य पक्षाचे नेते डाॅ.विनय कोरे यांची वारणानगर येथे जाऊन लिंगायत संपर्क मोहिमे अंतर्गत भेट घेतली.त्याप्रसंगी उभयतांमध्ये व्यापक आणि उपयुक्त चर्चा झाली.

● ठोस कृती कार्यक्रम

काही लोकप्रतिधींचे समाजहिताकडे लक्ष नाही,त्यामुळेच समजाचे विषय प्रलंबित आहेत,युवा वर्गाला रोजगार नाही.यावर आता ठोस कृती कार्यक्रम आखणे गरजेचे आहे,शिवाय लिंगायत समाजबांधवांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून शैक्षणिक व आर्थिक सुधारणांसाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे,म्हणूनच आपण पुढाकार घेऊन समाजासाठी वेळ देणार असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला.वीरशैव समाजातील आठरा पगड उपजातीनां सोबत घेऊन वाटचाल करण्याचा विचार मागे पडत आहे,अशी खंतही आमदार कोरे यांनी व्यक्त केली.

Rate Card

● शासनासोबत लवकरच बैठक

 

मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर स्मारकाची उभारणी आणि लिंगायतांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ तसेच गाव तेथे स्मशानभूमी यासाठी शासन स्तरावर जलद गतीने कार्यवाही होण्यासाठी सर्व लिंगायत आमदार आणि संघटना प्रमुखांची तात्काळ बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह प्रशासन प्रमुखांची वेळ घेण्याची भूमिका यावेळी डाॅ.बसवराज बगले यांनी मांडली. या चर्चेत महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे कार्याध्यक्ष वे.शिवानंद हिरेमठ ( मंद्रुप ) उपाध्यक्ष सुभाष बसवराज पाटील ( संख ) सचिव निंगोंडा तळे यांचाही सहभाग होता.

● लिंगायत संघटनांचे मनोमिलन

याशिवाय ” सकल लिंगायत महासमितीच्या धोरणानुसार ” सर्व वीरशैव आणि लिंगायत संघटना प्रमुखांचे मनोमिलन घडवून ” किमान समान धोरणांची अंमलबजावणी ” करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.त्यासाठी रणनिती ठरविण्याबाबत चर्चा झाली.गणेशोत्सवानंतर या मोहिमेला प्राधान्य देण्याचे यावेळी ठरले अशी माहिती डाॅ.बगले यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.