रिक्त संख्येनुसार शिक्षकांचे समायोजन करावे : विक्रम ढोणे

0
2
जत,संकेत टाइम्स : आंतर जिल्हा बदली मधून सांगली जिल्हात आलेल्या प्राथमिक शिक्षकांचे तालुकानिहाय समांतर बाब लक्षात न घेता रिक्त शिक्षक पदांची संख्या लक्षात घेऊन समायोजन करण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 

जत तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षकांची २७६ इतकी पदे रिक्त असून या पदांचा अतिरिक्त भार इतर शिक्षकांवर असल्याने अध्ययन व अध्यापन करताना खूप अडचणी येत असून त्याचा विद्यार्थांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे विशेष म्हणजे जिल्हामध्ये जत तालुक्यामध्ये प्राथमिक शाळांची संख्या आणि प्राथमिक शाळेत शिक्षण घेण्याची विद्यार्थी संख्या मोठी आहे
त्यामुळे तालुका निहाय समांतर बाब विचारात न घेता रिक्त असलेल्या पदांची संख्या लक्षात घेऊन आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचे समायोजन केल्यास तालुक्यातील रिक्त शिक्षक पदे भरली जाऊन दुष्काळी जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल म्हणून जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य निर्णय घेऊन दुष्काळी भागातील विद्यार्थांवरील अन्याय दूर करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरील पालकांचा असलेला विश्वास दृढ करण्याचा आशावाद युवा नेते विक्रम ढोणे यांनी व्यक्त केला
शिक्षकदिनी  लाक्षणिक आंदोलन
तालुक्यातील अनेक शाळा धोकादायक बनल्या आहेत. गेल्या महिन्यात दरिबडची येथील शाळेचे भिंत पडली आहे तर त्या शाळेचं निर्लेखित प्रस्ताव एक वर्षभर प्रशासनाकडे पडून होता शेवटी ग्रामस्थांनी आंदोलन केलं त्यानंतर कार्यवाही सुरू झाली  यापूर्वी अंकलगी, रामपूर या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत . सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तालुक्यातील अनेक वर्गखोल्या धोकादायक आहेत.यांचे निर्लेखित प्रस्ताव प्रशासन स्तरावर अनेक दिवसापासून प्रलंबित आहे त्यामुळे तातडीने कार्यवाही पूर्ण करावी
     येळवी येथील रानमळा शाळा घोलेश्वर येथील तांबेवाडी, बाज येथील कोंडीगिरे वस्ती, शिंगणापूर येथील ४ वर्गखोल्या,सोर्डी,संखं , जत नगरपरिषद हद्दीतील पवारवाडी, माने वस्ती येथील जिल्हा परिषद शाळा यासह अन्य शाळेच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. भविष्यातील धोका टाळावा म्हणून सदरच्या खोल्या नव्याने बांधण्याची गरज आहे
५ सप्टेंबर शिक्षक दिनापूर्वी तालुक्यातील धोकादायक निर्लेखित प्रलंबित प्रस्तावित इमारतीचे निर्लेखित करावे अन्यथा शिक्षकदिनी विद्यार्थी पालक यांना सोबत घेऊन लाक्षणिक आंदोलन पंचायत समिती जत समोर करण्यात येईल आणि जोपर्यंत जत तालुक्यातील धोकादायक शाळांचे प्रलंबित प्रस्ताव  निर्लेखित होणार नाही तोपर्यंत जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि तालुका शिक्षणाधिकारी यांना दररोज पुच्छगुच्छ देऊन गांधीगिरी आंदोलन करण्यात येईल अशी माहिती विक्रम ढोणे यांनी दिली.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here