जत,संकेत टाइम्स : जिल्ह्यातील जत तालुक्यात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दारू पिण्यासाठी मुलाने वडिलांकडे जास्त पैशांची मागणी केली होती. परंतु, वडिलांनी नकार दिल्याने मुलाने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात स्टूल घालून हत्या केली. आप्पासो कृष्णा तोरवे (६५) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. आप्पासो पेशाने सैनिक होते. तर प्रमोद आप्पासो तोरवे असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. ही भयंकर घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी गावात घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रमोदला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.