राजे रामराव महाविद्यालय, जत येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचे अभ्यास केंद्र सुरू
जत,संकेत टाइम्स : जत येथील राजे रामराव महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU), नाशिक यांचे अभ्यास केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा.(डॉ.)सुरेश एस.पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा.(डॉ.)सुरेश एस.पाटील म्हणाले की,ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता न आलेल्या विद्यार्थी व नोकरदार यांची सोय झाली आहे. सध्या बी.ए. (सर्व विषय) व एम.ए. (इंग्रजी व अर्थशास्त्र) हे अभ्यासक्रम सुरू करणार आहे.तसेच भविष्यात पदव्युत्तर विभागातील सर्व विषय सुरू करण्यार असल्याचे सांगितले.

यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यांचा फायदा होणार आहे.तरी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्र समन्वयक डॉ. सज्जन एम.बी. (९७६६००२९२९) व श्री.राजू माळी (९५०३९७०९७३) यांचेशी संपर्क साधावा असे आव्हान केले आहे.