संख,संकेत टाइम्स : येथील श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेच्या, श्री आर के पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला एम कॉम. व एम.ए. (अर्थशास्त्र लोकप्रशासन) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची मान्यता मिळाली असून महाविद्यालयामध्ये या अभ्यासक्रमांची चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे,अशी माहिती संस्थेचे सचिव अजय बिरादार यांनी दिली.
संख येथील श्री शिवलिंगेश्वर संस्था ही ग्रामीण व दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय करून देणारी एकमेव संस्था आहे.या संस्थेने श्री आर के पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरु करून उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय करून दिली आहे.मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र असलेल्या या महाविद्यालयामध्ये बी. ए. बी. कॉम.या पदवी स्तरावरील अभ्यासक्रमाबरोबरच एम. ए. मराठी व इंग्रजी एम.कॉम.या विषयांच्या पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.तर चालू शैक्षणिक वर्षामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून अर्थशास्त्र व लोकप्रशासन (एम.ए.) व वाणिज्य शाखेच्या (एम.कॉम.) पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे.
डी. एस.एम.शालेय व्यवस्थापन पदवीका कोर्स ला ही लवकरच मान्यता मिळेल.पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठीं सोय झाली आहे. प्रवेश व माहितीसाठी 8261973488 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.तरी परिसरातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेचे सचिव अजय बिरादार यांनी केले आहे.