जत तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा सन्मान होणार | – अभय जमदाडे

0
जत,संकेत टाइम्स : समाजाच्या जडण घडणीत शिक्षकाचे मोठे योगदान आहे.तालुक्यातील उल्लेखनीय कार्य केलल्या शिक्षकांना शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करणार आहे. हा सन्मान सोहळा प्रकाशराव जमदाडे यूथ फाऊंडेशनतर्फे होणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय जमदाडे यांनी दिली.
जमदाडे म्हणाले, या सन्मान सोहळ्यास प्रांताधिकारी जोगेंद्र कटयारे, साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशी, गटविकास अधिकारी दिनकर खरात,गटशिक्षणाधिकारी रतीलाल साळुंखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ५८ शिक्षकांचा सन्मान होणार आहे.

 

यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, सुरेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील,जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब, उपनगराध्यक्ष आप्पा
पवार, मोहन कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा जत येथील जिल्हा बँकेच्या मार्केट यार्ड शाखा येथील सभागृहात सोमवारी दुपारी चार वाजता होणार आहे.
Rate Card

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.