मारामारी,मिसळपावचे जनक काळाच्या पडद्याआड | – महानिंग तात्या महाजन यांचे ८४ व्या वर्षी निधन

0
3

डफळापूर : येथील जेष्ठ हॉटेल व्यवसायिक महानिंग सि.महाजन यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.पोटाची खळगी भराण्यासाठी जवळपास 35 वर्षापुर्वी सुरू केलेल्या हॉटेल व्यवसायाला अपार परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर प्रसिद्ध केले होते.या व्यवसायात महाजन ब्रँड म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला होता.व्यवसायात यश आणि अपयश हे असतंच. पण अपयशानं डगमगून न जाता नव्या जिद्दीनं पुन्हा शून्यातून नवं विश्व उभारता येतं, हे महानिंग महाजन तात्या यांनी आपल्या यशस्वी व्यवसायानं सिध्दही करुन दाखविले होते.डफळापूर येथील यशस्वी उद्योजक असलेल्या महाजन कुंटुबातील तात्यांच्या जाण्याने पहिला तारा निखळला आहे.गेल्या काही दिवसापासून त्यांना प्रकृति साथ देत नव्हते,गेल्या महिन्यात त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता.जगण्याची मोठी उमेद यामुळे त्यांनी त्यावरही मात केली होती.गेल्या आठदिवसापर्यत ते स्टँडसमोरील हॉटेलमध्ये येत होते.गत पंधवड्यात त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा केला होता.तेंव्हापासून त्यांच्या तब्येत चांगली सुधारिली होती.पुर्वीप्रमाणे ते उत्साहाने हॉटेलमध्ये येत होते.त्यांच्या दुसऱ्या चिंरजिवाचा नातूही गेल्या काही दिवसापासून मदतीला आला होता.सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना बुधवारी सायकांळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.
महानिंग तांत्यांनी हे यश त्यांना सहज मिळालेलं नव्हतं. त्यांच्या या विजय गाथेमागं प्रचंड परिश्रम आणि त्यांनी घेतलेल्या अचूक निर्णयांचा इतिहासही दडला आहे. पैसा हा व्यवसायाचा प्राणवायू. पण तो नसला म्हणजे मन सैरभैर होतं. पुढचं काही सुचत नाही. अशा वेळी न खचता पुढं जाणं हेच महत्वाचं असतं. तुमची जिद्द असेल तर यश मिळतंच! असं त्यांचं म्हणणं!ज्यांनी संकटाच्या वेळी आपल्याला मदत केली, त्यांना कधीही विसरु नका. ज्यांच्या जीवावर आणि श्रमावर तुम्ही यशस्वी होता, त्या व्यवसायातल्या कर्मचारी-कामगारांचे संसार सुखी व्हावे, हेही लक्षात घ्या. आपण मालक नाही, तर त्यांचे सहकारी आहोत, हेही लक्षात ठेवा. ग्राहक आपला देव आहे, याचा विसर पडू देऊ नका. समस्यांच्या कोंडीत डोकं स्थिर ठेवा. पैसा आला म्हणजे उधळू नका. साधं रहा आणि साधंच जगा. असं केलं म्हणजे जीवनात यश मिळतंच, हे आपले अनुभवाचे बोल त्यांनी सातत्यानं सांगितले आहेत.
माणसांना नेहमी देणारा असावा, घेणारा नाही, हा धडा आई-वडिलांनी दिला, तो जीवनात आचरणातही आणला. अपयश खुणावत असतानाही, त्याला पायदळी तुडवून यश मिळवलं आणि ते आपलं एकट्याचं नाही. त्यात पत्नी, मुलं आणि व्यवसायातले सहकारी यांचाही वाटा आहेच, असंही विनम्रपणे ते सांगतात. व्यवसायिक माणसांसाठी दोन धोकेबाज गोष्टी म्हणजे भावनेच्या आहारी जाणं आणि नको त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं, हे दोन दुर्गुण व्यावसायिकांना दूर ठेवायला हवेत. जीभही जगातली सर्वात गोड आणि सर्वात कडू वस्तू आहे. तिचा उपयोग करताना शंभरदा विचार करा. तोंडातून शब्दांचे बाण सुटण्याआधीच ही गोष्ट लक्षात ठेवा, असा लोकसंग्रहाचा-यशस्वितेचा मूलमंत्रही त्यांनी सांगून ठेवला आहे. ज्या त्या वेळी काम करा, आळशी होऊ नका. यशस्वीतेपर्यंत पोहोचणारी शिडी एकाच दिवसात चढता येत नाही, हे लक्षात ठेवा, असंही त्यांचं म्हणणं आहे. चांगला विचार आणि आनंद देण्यानं वाढतो. तसाच सुखाचा मूलमंत्र दिल्यानं यश मिळतं, यावर आपली पूर्ण श्रध्दा आहे, असा महानिंग तात्या यशाचा मूलमंत्र सांगत होते.
मारामारी,मिसळपावला नवा आयाम दिला
डफळापूरात आले की मारामारी चहा,मिसळपाव खायाचाच अशी काहीशी ओळख खवय्यासाठी महाजन बंन्धूनी निर्माण केली होती.स्टँडजवळ व पार कट्टयाजवळ अशी दोन हॉटेल महाजन बंन्धूची आहेत.खाद्य पदार्थातील मारामारी,मिसळपावला नवा आयाम दिला.
सर्वत्र हळहळ
डफळापूर मध्ये स्टँडसमोर महानिंग तात्या यांचे हॉटेल आपल्या दोन मुलासह ते हा व्यवसाय करत होते.येथे काम करणारे कामगारही त्यांच्या घरचे सदस्य असल्याप्रमाणे ते त्यांना जपत होते.पगारापेक्षाही काही वेळा ते कामगारांना मदत करत,त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.बाजार पेठ बंद ठेवून त्यांना श्रंध्दाजली वाहण्यात आली.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here