डफळापूर जि.प.शाळा १ च्या शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन | अध्यक्षपदी सागर महाजन
डफळापूर : डफळापूर येथील शाळा नंबर 1 मध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले.यासाठी पालक सभा घेऊन सदस्यांची निवड करण्यात आली.या सदस्यामधून अध्यक्षपदी सागर सिद्राम महाजन,तर उपाध्यक्ष म्हणून सोनाली अमोल चव्हाण यांची निवड करण्यात आली.
समितीचे पुनर्गठन उत्साहाने पार पडले. यानंतर पूर्व अध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी नवनियुक्त समितीचे पुष्प देऊन स्वागत केले.नुतन अध्यक्ष सागर महाजन म्हणाले,शाळेतील मुलांची गुणवत्ता वाढविणे,शिक्षकांच्या अडचणी सोडविणे,त्याशिवाय जिल्हा परिषद शाळा सक्षम होतील यासाठी आम्ही सर्वजण शिक्षकांना सर्वोत्तरी सहकार्य करू,असे आश्वासन दिले.शाळेकडून विविध मागण्या प्राधान्य क्रमाने द्याव्यात अशी विनंतीही महाजन यांनी केली.
यामध्ये नवनियुक्त सदस्य सागर महाजन (अध्यक्ष) सोनाली चव्हाण (उपाध्यक्ष) ,किशोर पाटील ,शरद माळी ,विद्या गुरव ,विशाल पाटोळे ,मनीषा मलमे ,वर्षा मलमे , संजय सवदे ,संगीता शिंदे , मन्सूर नदाफ ,शिफा मुल्ला , शिवदास संकपाळ ,भारती हताळे आदी सदस्यांचा समावेश आहे.तर गणेश पाटोळे शिक्षणप्रेमी म्हणून या समितीत घेण्यात आले आहे.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका इनामदार मॅडम व देसाई मॅडम यांनी शाळेतील कामकाज विविध स्पर्धा स्पर्धेतील विद्यार्थी या याबाबत सदस्यांची चर्चा केली.या सर्व कार्यक्रमाचे नियोजन संचालन व आभार श्री.राठोड सर यांनी केले.