कवठेमहांकाळ येथे दिवसाढवळ्या घरफोडी | अडीच तोळे सोने,रोखड पळविली 

0
Post Views : 23 views
कवठेमहांकाळ,संकेत टाइम्स : कवठेमहांकाळ शहरातील देशिंग रोडला राहणाऱ्या शीतल हणमंत तेली यांच्या घरी दिनांक २ ऑक्टोबर रोजी घरातील सर्व सदस्य शेतात कामानिमित्त गेलेले पाहून चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाची तोडफोड करून कपाटातील रोख रक्कम दहा हजार आणि अडीच तोळे सोने असा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी,शीतल हणमंत तेली हे दिनांक २ ऑक्टोबर रोजी आई,वडील आणि पत्नी सोबत त्यांच्या द्राक्ष बागेत शेणखत घालण्यासाठी गेलेले होते.घरी कोणीच नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरात प्रवेश करून आतील खोलीत असलेले कपाट फोडून कपाटातील रोख रक्कम दहा हजार तसेच १ सर,१घंटण,सोन्याची अंगठी,रिंगा आणि वेल असा अडीच तोळ्यांचा ऐवज लंपास केला आहे.
दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ च्या सुमारास झाडलोट करताना घरातील स्त्रियांना शंका आल्याने त्यांनी पाहणी केली असता घरी चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.याबाबत शीतल तेली यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात चोरी बाबतची तक्रार दाखल केली आहे.
ऐन सणासुदीच्या काळात काही दिवसापूर्वी याच देशिंग रोड वर देशिंग येथील ग्रामपंचायत कार्यालयासह गावातील एक पान शॉप आणि एक जनरल स्टोअर्स फोडून जवळपास चाळीस हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता.ती घटना अजून ताजी असताना आणि त्या घटनेतील चोर अजून मिळून आले नसताना जाधव मळा येथे घडलेल्या दिवसा ढवळया चोरीच्या प्रकारामुळे शहरात खळबळ माजली असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.