मातोश्री वृद्धाश्रमात फॅबटेक पब्लिक स्कूल तर्फे दिवाळी सामानाची भेट

0
5

 

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने मातोश्री वृद्धाश्रमात दिवाळी सणानिमित्त दिवाळीचे सामान व भेटवस्तू दिल्या. जागतिक अन्नदान सप्ताहनिमित्त सर्वदानात श्रेष्ठ अन्नदान आहे. गरजू व्यक्तीला नेहमी दान करावे वृद्धाश्रमातील वृद्धांनाही दिवाळी सणाचा आनंद मिळावा या हेतूने प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी दिवाळी सामान वृद्धांना भेट देऊन आपले समाजाप्रती कर्तव्य पूर्ण केले.

 

याप्रसंगी सुपरवायझर सौ वनिता बाबर, श्री सतीश देवमारे, डॉ. अमोल रणदिवे, श्री प्रवीण उबाळे उपस्थित होते. मातोश्री वृद्धाश्रमाचे राहुल जाधव, बाळासाहेब काकडे, हरिदास कांबळे, सुमन कांबळे यांनी अन्नदात्यांचा गौरव करून आभार मानले. वृद्धाश्रमात दिवाळी भेटवस्तू देण्यासाठी संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांचे  मार्गदर्शन मिळाले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here