जग तिसऱ्या महायुध्दाकडे वाटचाल करीत आहे याला “संयुक्त राष्ट्रसंघाने”रोखले पाहिजे

0

 

 

2020 मधील अजरबैझान-आर्मेनिया युद्ध ,2021 चे अफगाणिस्तान-तालिबान युद्ध हे महाभयानक युद्ध झाले होते.गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध हे अत्यंत भयावह स्थितीमध्ये असुन परमाणू युध्दाची शक्यता वर्तवली जात आहे.कारण हे युद्ध आता रशिया -युक्रेनपुरते सीमित रहाले नसुन नाटो विरूद्ध रशिया अशी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे तिसऱ्या महायुध्दाचे स्पष्ट संकेत दिसत आहे.त्याचप्रमाणे चीन-तैवान संघर्ष सुरूच आहे. अशा भयावह स्थितीची पुणरावृत्ती होणार नाही याची दक्षता “संयुक्त राष्ट्रसंघाने”घेतली पाहिजे.कारण सध्याच्या परिस्थितीत रशिया -युक्रेन युद्ध जगाला हादरा देवू शकते.याकरिता जगातील “विध्वंसकारी” परीस्थिती पहाता “संयुक्त राष्ट्रसंघाने” कठोर पाऊल उचलण्याची गरज.आज संयुक्त राष्ट्रसंघ 77 वर्षांचा झाला असला तरीही जगात संघर्ष सुरूच आहे ही अत्यंत चिंताजनक व गंभीर बाब आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना अनेक देशांतील घडामोडीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत असते.पहिल्या महायुद्धानंतर 1929 मध्ये “राष्ट्र संघाची” स्थापना करण्यात आली.

 

 

परंतु “राष्ट्रसंघ” प्रभावहीन असल्यामुळे “संयुक्त राष्ट्रसंघटनेची”24आक्टोंबर 1945 ला स्थापना करण्यात आली.यावेळी संयुक्त राष्ट्र अधिपत्रावर 50 देशांच्या सह्यानीशी याची स्थापना करण्यात आली.परंतु आता जगातील अनेक देश संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य आहेत.यामुळे प्रत्येक देशाला आप-आपल्या तक्रारी मांडन्याचा अधिकार संयुक्त राष्ट्रसंघटनेने दीलेला आहे.युध्द जन्य परीस्थिती,भुकमरी, कुपोषण,मानवधिकार,अंतराष्ट्रीय सुरक्षा,आर्थिक विकास, सामाजिक प्रगती आणि विश्र्व शांति इत्यादी संपूर्ण बाबींनवर चर्चा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून केली जाते.दुसऱ्या महायुद्धानंतर विजयी झालेल्या देशांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्राला आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने संघटनेची स्थापना करण्यात आली.संघटनेचा उद्देश हा आहे की भविष्यात द्वीतिय महायुध्दासारखी महाभयानक परीस्थिती उदभवु नये या उद्देशाने याची स्थापना करण्यात आलेली आहे.संयुक्त राष्ट्र संघटनेची संरचना शक्तीशाली देश अमेरिका,फ्रांस,ब्रिटन,रूस आणि संयुक्त राजशाही यांनी द्वीतीय विश्र्व युध्दात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती.सध्याच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्रसंघटनेमध्ये 193 देश आहेत.जगातील सर्वच आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त देश या संस्थेशी जुडुन आहेत.या संस्थेची संरचना,आम सभा,सुरक्षा परिषद, आर्थिक व सामाजिक परिषद, सचिवालय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय या संपूर्ण बाबीं या संस्थेमध्ये आहेत.संयुक्त राष्ट्र संघटना ही एक चांगली आंतरराष्ट्रीय उपयोगी संघटना आहे. गेल्या 20 वर्षापासुन अफगाणिस्तानमध्ये अमेरिका व नाटोची सेना होती.यामुळे अफगाणिस्तानची जनता स्वतःला सुरक्षित समजत होते.

 

 

परंतु अमेरिकेने 2021 मध्ये आपले सैन्य माघारी बोलावल्यामुळे अवघ्या 100 दिवसात खुनी तांडव निर्माण होवून लाखो निरअपराध्यांचा बळी तालिबानी आतंकवाद्दांनी घेतला व अफगाणिस्तानवर संपूर्ण कब्जा मिळविला आणि अफगाणिस्तानला रक्ताच्या लाथोळ्यात लोटले.परंतु यात संयुक्त राष्ट्र संघाने थोडासाही हस्तक्षेप केला नाही ही संयुक्त राष्ट्रसंघाची शोकांतिकाच म्हणावी लागेल.संयुक्तराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून पाकिस्तान नेहमी भारताच्या विरूद्ध चिखल फेक करीत असतांना दीसुन येते.सिरियामधील अत्याचाराच्या घटना संयुक्त राष्ट्रसंघापुढे मांडुन या घटना जम्मु काश्मिरमध्ये घडत असल्याचे सांगून भारत मानवाधिकाराचे उल्लंघन करीत असल्याचा “पोपोगंडा”पाकिस्तान नेहमीच करीत असतो. कारण भारतीय घटनेतील 370 व 35 ए कलम हटविल्याचे दु:ख पाकिस्तानला जास्तच होत असल्याचे दिसून येते.त्यामुळे हा मुद्दासुध्दा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये अनेकदा नेलेला आहे.परंतु संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानचे संपूर्ण आरोप फेटाळून लावले.आज संयुक्त राष्ट्र संघ नसता तर जगामध्ये अनेक देशात आपसा-आपसात युध्द पहायला मिळाली असती. कारण आज जगातील संपूर्ण राष्ट्रे “बारूदच्या ढीगाऱ्यावर”बसली आहेत व एकमेकांना धमकी देताना दिसतात.परंतु संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून अनेक राष्ट्रांमध्ये होत असलेला संघर्ष व कटुता दुर करण्याचे काम आज संयुक्त राष्ट्र संघटना करीत आहे.आज उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात नेहमी तनातनीचे वावरत दीसायचे परंतु संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्यात आला व युध्दजन्य परीस्थिती हाताळण्याचे काम संयुक्त राष्ट्रसंघटनेने केले.उत्तर कोरियाचा “तानाशहा किंम जोंग उन” हा नेहमी अमेरिकेला युध्दाची धमकी देत असतो परंतु संयुक्त राष्ट्रसंघटना याला हाताळण्याचे काम करीत असते.

 

 

2020 मध्ये अजरबैझान-आर्मेनिया यांच्यातील संघर्ष टोकाला गेला होता.यांच्या संघर्षामुळे तिसऱ्या महायुद्धाचे बादल जगावर दिसत होते.कारण अजरबैझान-आर्मेनिया यांचा संघर्ष गेल्या 100 वर्षांपासून सुरू आहे.हा संघर्ष थांबावा याकरिता अमेरिका व रशिया कसोटीचे प्रयत्न करीत होते परंतु युद्ध थांबे ना.यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने अजरबैझान-आर्मेनिया यांच्यातील संघर्ष थांबवीण्या करीता युध्दपातळीवर प्रयत्न करून युद्ध थांबवीले.अन्यथा मुस्लिम राष्ट्र विरूद्ध ईसाइ राष्ट्र अशी युद्धाची स्थिती उद्भवण्याची शक्यता होती.अशी कठीण परिस्थिती निवळण्याकरीता “संयुक्त राष्ट्र संघाने”टोकाची भूमिका घेने गरजेचे असते. चीनने सुपर पावर बनण्याच्या उद्देशाने वुहान मधुन कोरोणा व्हायरस निर्माण केला,कोरोणा महामारीने जगात मृत्यूचे तांडव निर्माण केले.याकरिता “संयुक्त राष्ट्रसंघाने” जगातील संपूर्ण संघर्षमय परिस्थितीला हाताळण्याची गरज आहे.अन्यथा अनर्थ होऊ शकतो याला नाकारता येत नाही.चीनची विस्तारवादी नीती रोखण्याकरीता व पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया रोखण्याकरीता पश्चिम आशियात नवे “क्वाड” स्थापन करण्यात आले आहे यात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जापान हे देश आहेत यामुळे आशिया खंडात शांतता प्रस्थापित करण्यास मोठी मदत होणार आहे.संयुक्त राष्ट्रसंघ जरी 77 वर्षांचा झाला असला तरी त्यात नवीन उर्जा निर्माण करून जगातील संघर्षमय वातावरण यावर ताबडतोब अंकुश लावण्याची गरज आहे.कारण संयुक्त राष्ट्र संघाने अनेक महत्वपूर्ण कार्य केले आहे याचे उदाहरण जगापुढे आहे. पाकीस्तान आताही खुंखार आतंकवाद्यांना खत पाणी देत आहे व भारत विरोधी कारवाईला अंजाम देण्याचे काम नेहमीच करीत असतो.परंतु भारत त्याला जशास तसे उत्तर देत आहे.संयुक्त राष्ट्रसंघटनेला भारताने सीध्द करून दाखवले की भारत विश्वामध्ये शांती प्रस्थापित करू शकते.

 

भारताचे प्रखर नेत्यृत्व व प्रखर विचाराने संपूर्ण संयुक्त राष्ट्रसंघनेतील 193 देश प्रभावीत आहे.त्यामुळेच आज भारताची मान उंचावली आहे.भारत नेहमी कोणाच्याही सुख दुःखात सहभागी होत असतो. कारण कठीण घडीला मदत करने ही बाब भारताच्या संस्कृतीमध्ये व रक्ता-रक्तामध्ये आहे.हीबाब इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी,सुष्मा स्वराज, नरेंद्र मोदी यांनी सीध्द करून दाखविली. भारताने नेहमी मानवाच्या कल्याणासाठी व हीतासाठी आवाज बुलंद आहे यात पर्यावरणाचा मुद्दा,ग्लोबल वॉर्मींग व निसर्गाची ढासळती परीस्थिती या संपूर्ण बाबींवर भारताने संयुक्त राष्ट्राचे लक्ष केंद्रित केले आहे.भारताने आणि संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानला नेहमी रक्ताच्या थारोळ्यातुन बाहेर काढण्याचे प्रयत्न केले आहे. परंतु पाकिस्तानच्या वागनुकीवरून असे दीसुन येते की “कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच” यामुळे पाकिस्तानने आतातरी सुधरूनजावे अन्यथा पाकिस्तानचा विनाश अटळ आहे.आज जगात कोणत्याही देशांशी वैरत्व करने म्हणजे तिसऱ्या महायुद्धाकडे वळने होय.देशा-देशामध्ये कटुता निर्माण होवु नये किंवा कटुता निर्माण झाली तर ती निवळण्याकरीता आज “संयुक्त राष्ट्र संघटना” रोखठोक भुमिका बजावण्याचे काम करीत आहे.अन्यथा महायुद्ध केंव्हाही उद्भवले असते.परंतु यावर ब्रेक आणि लगाम लावण्याचे काम “संयुक्त राष्ट्र संघटना” करीत आहे.म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून जनकल्यानाचे काम मोठ्या प्रमाणात होतांना दीसते.गेल्या 75 वर्षांपासून भारताविरुद्ध पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या आणि आहे.परंतु भारताने पाकिस्तानची पोल खोलल्याने “संयुक्त राष्ट्र संघाने”पाकिस्तानला आता पंगु केल्याचे दिसून येते.त्यामुळे संयुक्त राष्ट्राने आनखी कडक प्रतीबंध लावुन पाकिस्तानला त्याची जागा दाखविली पाहिजे.आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या नजरेत भारत विश्र्वशांतीचा दुत असल्याचे संबोधले जाते.आज जगातील देशांकरीता काही निर्णय घ्यायचा असला तर सर्वप्रथम “संयुक्त राष्ट्र संघ” भारताशी संवाद करून निर्णय घेत असतो. “संयुक्त राष्ट्र संघटना”ही जगाला “जिवनदान” देणारी संस्था असल्याचे मी समजतो.21 व्या शतकात मानवी युध्दापेक्षा आता  “द्रोणने”युध्द सुरू झाल्याचे दिसून येते.द्रोणचे युध्द जगाला घातक सीध्द होवु शकते.

 

Rate Card

कारण अत्याधुनिक युगात संपूर्ण देश सध्याच्या परीस्थितीत अत्याधुनिक शस्त्र सामग्री, अनुबॉम्ब,मीसाईल,बॅलेस्टीक,क्लस्टरबॉम्ब, अणुबॉम्ब अशाप्रकारचे विनाशकारी आणि घातक शस्त्र सामग्री जगातील संपूर्ण देशांनी अवगत केले आहे.आज संपूर्ण देश अत्याधुनिक द्रोण खरेदीच्या शर्यतीत आहे व प्रत्येक देश यात सामोरं जान्याच्या शर्यतीत आहे.यावर “संयुक्त राष्ट्रसंघाने” लक्ष ठेवण्याची गरज आहे.अन्यथा पृथ्वीचा विनाश दुर नाही.1945 ला संयुक्त राष्ट्रांची परीस्थिती वेगळी होती.परंतु गेल्या 5 वर्षात संपूर्ण जगात अत्यंत संघर्षमय वातावरण निर्माण झाले आहे.याकरीता संयुक्त राष्ट्र संघाला आणखी कडक नियमावली तयार करून जगातील “खुनी संघर्ष” थांबवीलाच पाहिजे.1945 च्या नंतरची आव्हाने आवश्यकतेनुसार वेगळी होती.परंतु आज संपूर्ण जगापुढे वेगळे आव्हान आहे.पण ज्या हेतूने संयुक्त राष्ट्रांची स्थापणा झाली तो हेतू आजही आहे का ?असा प्रश्न जगापुढे उपस्थित आहे.जगात पुर्वीही गृह युद्ध व्हायची आणि आजही अनेक देशांमध्ये गृहयुद्ध सुरू आहे.परंतु आजचे गृह युद्ध तिसऱ्या महायुद्धाच्या दीशेने वाटचाल करतांना दिसत आहे.

 

आज संपूर्ण जगावर संयुक्त राष्ट्र संघाचे नियंत्रण असने गरजेचे आहे.संयुक्तराष्ट्र संघाची स्थापना यासाठीही करण्यात आली की दुसऱ्या महायुद्धासारखी परीस्थिती पुन्हा उदभवु नये.परंतु दु:खाची बाब म्हणजे आज संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. जगातील बदलता काळ पहाता व युध्दाची गंभीर परिस्थिती पहाता संयुक्त राष्ट्र संघाने कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे.यावरून स्पष्ट होते की संपूर्ण जग युध्दाच्या खाईत लोटल्या जात आहे.त्यामुळे 24 आक्टोंबर संयुक्त राष्ट्र दिवस”लक्षात घेता कठोर पाऊल उचलुन जगातील युद्ध जन्यपरीस्थितीत रोखली पाहिजे.सध्याच्या परिस्थितीत दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे व रशिया-युक्रेन युध्दामुळे तिसऱ्या महायुद्धाचे काळे बादल संपूर्ण जगभर दीसत आहे.त्यामुळे सध्याची कठीण परिस्थिती पहाता “संयुक्त राष्ट्र संघाने” शांतता प्रस्थापित करण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे.अन्यथा पृथ्वीचा व संपूर्ण जीवसृष्टीचा विनाश अटळ आहे.                    

 

 

लेखक रमेश कृष्णराव लांजेवार,मो.नं.9921690779, नागपूर. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.