जत : सर्वसामान्य सभासदांचे हित जोपासणाऱ्या शेगाव येथील शिवशंभो मल्टिस्टेट निधी लिमिटेड या अर्बन निधी बँकेच्या वतीने सभासदांना गिफ्ट वाटप करण्यात आले. पतसंस्थेची नुकतीच सर्वसाधारण सभा पार पडली. निधी बँकेच्या प्रत्येक सभासद व ठेवीदारांना बॅग गिफ्ट स्वरुपात देण्यात येत आहे.याचा प्रारंभ ज्येष्ठ नागरिक आर. डी.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
बोराडे म्हणाले, बेरोजगार युवक छोटे-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत असतात. हे व्यवसाय सुरू करताना व सांभाळताना अनेक अडचणींना समोरे जावे लागते.विशेषकरून आर्थिक चणचणीला तोंड द्यावे लागत असते. या सर्वांचा विचार करून अशा छोट्या-मोठ्या
व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना आर्थिक मदत व्हावी, या उदात्त हेतूने शिवशंभो मल्टिस्टेट निधी लिमिटेड या अर्बन निधी बँकेची स्थापना करण्यात आली.
बोराडे म्हणाले, पानटपरी, हातगाडे, फळ भाजीपाला विक्रेते,किराणा, जनरल स्टोअर्स, कापड दुकान या व्यापाऱ्यांना बचतीची सवय लावून कर्ज वाटप करण्यात येते. यावेळी चेअरमन लक्ष्मण बोराडे यांना ‘सकाळ आयडॉल’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासदांच्या वतीने डॉ. शिवाजी खिलारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी शहाजी बोराडे, माणिक बोराडे, डॉ. दीपक तेली, बजरंग गायकवाड, अनिकेत व्हनखंडे, लक्ष्मण खुडे, नम्रता शिंदे, राहुल ताटे, रणजित माने, आप्पासो बुवा, संजय शिंदे उपस्थित होते.




