आवंढीत आरोग्य शिबिरात पाचशे रुग्णांची मोफत तपासणी
Post Views : 3 views
आवंढी : आवंढी ता.जत येथे सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाऊंडेशन,मिरज , सिनरजी हॉस्पिटल मिरज व आवंढी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.उमा हॉस्पिटल जतचे डॉ.रविंद्र आरळी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. नागरिकांनी आपला आजार बळावायच्या आगोदर आपल्या तब्बेतीची काळजी घ्यावी जेणेकरुन आपला आजार लवकर बरा होईल.ग्रामीण भागातील लोक किरकोळ दुखण्याकडे वारंवार दुर्लक्ष करतात त्यामुळे तो आजार भविष्यात मोठा होतो.
त्यामुळे वेळीच उपचार घेणे गरजेचे असते.असे यावेळी डॉ.रविंद्र आरळी म्हणाले.शिबिरात ह्रदयविकार, मेंदु, बायपास शस्रक्रिया, मधुमेह, झनेत्ररोग,अँजिग्राफी,अँजिप्ला स्टि,फिट,मोतिबिंदू, पँरालायसिस,डोकेदुखी, चक्कर, स्नायुंचे आजार, हार्निया, मुळव्याध, पित्ताशयातील खडे , वयस्कर लोकांसाठी लघवीचा आजार , अँपेंडिक्स , पोटांच्या व इतर शस्रक्रिया यावर सेवासदन , सिनरजी , उमा , विठ्ठल , कोडग हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडुन तपासणी व उपचार करुन पुढील मार्गदर्शन करण्यात आले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री.संत बाळुमामा सेवाभावी संस्था, श्रीराम अर्थमुव्हर्स , शिवनेरी अर्थमुव्हर्स, सिध्दनाथ अर्थमुव्हर्स , गोल्ड अँन्ड सिल्व्हर नेपाळ , कोडग हॉस्पिटल, इंद्रायणी मेडिकल ,जनता मेडिकल यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी माजी सभापती संजिवकुमार सावंत, बाबासाहेब कोडग, भारत कोडग , माणिक पाटील,महेश कोडग , महादेव मरगळे , हरिदास बळवंत कोडग बुवा , रघुनाथ कोडग माऊली , राजुदादा कोडग , अंकुश शिंदे , दत्ताभाऊ चव्हाण ,हिम्मत कोडग , सतिश कोडग , जालिंदर कोडग , हणमंत कोळी , विजय कोडग , निरंजन कोडग , अनिकेत कोडग , नम्रता कोडग , आमोल पाटील , रोहन कोडग, आखिलेश कोडग उपस्थित होते. स्वागत व प्रस्तावना माजी उपसरपंच डॉ. प्रदिप कोडग यांनी केले.