सोसायट्यांची १०० टक्के वसूली करणाऱ्या सचिव,फिल्ड ऑफिसरना मिळणार बक्षिस | प्रकाश जमदाडे : जतेत बैठक

0

जत : सांगली जिल्हा मध्यवरती सहकारी बँकेत बँकेच्या विविध योजना व ओटीएस मुदत वाढ व सोसायटीच्या वसूली संदर्भात जत तालुक्यातील सर्व विविध सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन,सचिव ,बँकेचे अधिकारी यांची संयुक्तिक बैठक संपन्न झाली.जत तालुक्यातील ९ संस्थेचे १०० टक्के वसुली झाली आहे.त्या सोसायटीचे चेअरमन ,व्हा चेअरमन ,सचिव व फिल्ड ऑफिसर यांचा सत्कार करणेत आला.

 

इतर सोसायट्यांनीही अशी १०० टक्के ‌वसूली करावी. जून २०२३ ला १०० टक्के वसूली करणाऱ्या सचिव यांना २१०० रुपये व फिल्ड ऑफिसर यांना ११०० रुपयेचे पारितोषिक देणेची घोषणा यावेळी करण्यात आली.ओटीएस योजना ३० जून २०२० पर्यंत थकीत आहेत.या योजनेत समावेश असणाऱ्या सभासदाने ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ६ टक्के सरळ व्याज दराने थकीत रक्कम भरून योजनेचा लाभ घ्यावा. सचिव व फिल्ड ऑफिसर यांनी शेतकरी केंद्रबिंदु मानून काम करावे,असे आवाहन यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांनी केले.

Rate Card

 

 

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक,सहाय्यक निंबधक,बँकेचे वसूली अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.