खैरावमध्ये आमदार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा आंनदोत्सव साजरा

0
आंवढी,संकेत टाइम्स : शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे मशाल चिन्ह घेऊन अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना उमेदवार श्रीमती ऋतुजा लटके या विजयी झाल्याचा आंनदोत्सव साजरा करण्यात आला.जत तालुका शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष तथा शिवसेनेचे युवा नेते महेश कोडग यांच्या नेतृत्वाखाली खैराव ता.जत येथे संपन्न झाली.

 

 

जत तालुकाप्रमुख संजीवकुमार सावंत,तालुका संघटक बंटी दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यात शिवसेना उध्दव ठाकरे गट मजबूत करण्याचे काम सुरू आहे.त्या अनुषंगाने तालुक्यात बैठकांचे आयोजन केले जात आहे.खैराव येथेही बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पक्षाची भूमिका,पुढील निवडणूकांच्या दृष्टीने विचार मंथन करण्यात आले.नव्या सभासद फार्म भरून घेण्यात आले. खैरावसह परिसरातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका स्वतंत्र पँनेल करून लढविण्याचेही भूमिका कार्यकर्त्याची मांडली. त्यानुसार तयारीही सुरू करण्यात आली आहे.

 

 

छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्षपदी
युवा नेते महेश कोडग यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.जत‌ तालुक्यात शिवसेना उध्दव ठाकरे गटाची ताकत वाढवू,प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष ठामपणे उभा आहे,असेही यावेळी महेश कोडग यांनी सांगितले.
Rate Card
 जत तालुक्यातील खैराव येथे आ.ऋतुजा लटके यांच्या विजयाचा आंनदोत्सव साजरा करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.