संख,संकेत टाइम्स : संख सारख्या ग्रामीण भागातील व मध्यवर्गीय अंकलगी कुटूंबातील चेतनकुमार चंद्रकांत अंकलगी यांने शासकीय कोट्यामधून वैद्यकीय(MBBS)साठी प्रवेश मिळविला आहे.संखचे शिक्षक असणारे चंद्रकांत अंकलगी यांचे चिरजिंव आता डॉक्टर होणार आहेत.
चेतनकुमार यांचे प्राथमिक शिक्षण संख येथील श्री.निलांबिका बसवेश्वर शिक्षण संस्था संचालित लोकनायक जयप्रकाश नारायण कन्नड प्राथमिक शाळा बागेळीवस्ती येथे तर माध्यमिक शिक्षण श्री.राजारामबापू पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यू कॉलेजमध्ये चेतमकुमार अंकलगी यांने बारावीपर्यतचे शिक्षण घेतले आहे.वैद्यकीय प्रवेशासाठी असणाऱ्या नीट प्रवेशासाठी चेतनकुमार अंकलगी यांने विजापूर येथे खाजगी क्लासेस मधून सराव केला आहे.
नुकत्याच झालेल्या नीट परिक्षेचा निकाल लागला असून चेतनकुमार अंकलगी याला शासकीय कोट्यातून प्रवेश मिळाला आहे.त्याचो पुढील एमबीबीएसचे शिक्षण धारवाड वैद्यकीय महाविद्यालयात पुर्ण करणार आहे.
चेतनकुमार यांचे वडिल शिक्षक आहेत.तर आई गृहणी आहेत.कायम दुष्काळी संखसारख्या भागात शिक्षण घेत कोणताही वैद्यकीय वारसा नसताना चेतनकुमार यांनी मिळविलेले यश प्रेरणादायी आहे.
त्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जि.प.माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील, शाळेचे सचिव, मुख्याध्यापक,व सर्व शिक्षकांसह बसवराज बिरादार सर,पेपर एंजन्ट अनिल सायगाव मार्गदर्शन लाभले.चेतनकुमार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.