जत तालुक्यातील रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी द्यावा | – प्रकाश जमदाडे यांची खा.संजयकाका ‌पाटील यांच्याकडे मागणी

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या गावे,वाड्या-वस्त्यांना जोडणारे रस्ते कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूरी द्यावी, अशी मागणी खासदार संजयकाका ‌पाटील यांच्याकडे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी खा.पाटील यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, जत तालुक्यात राज्य मार्ग,जिल्हा मार्ग,इतर जिल्हा मार्ग,व ग्रामीण मार्गाची लांबी २२४६ कि.मी.आहे

 

आजही ‌यातील बऱ्याच रस्त्याची अद्याप दुरूस्ती झालेली नाही.त्यात प्रामुखाने उमराणी-बिळूर-साळमळगेवाडी रस्ता,खलाटी- मिरवाड-कुडणूर रस्ता,वाषाण-बेंळूखी रस्ता,तिकोंडी-कागनरी-लमाणतांडा ते राज्य हद्द,कोसारी-बागलवाडी-शिंगनहळ्ळी रस्ता,कुंभारी ते बाज(माधवनगरवाडी)रस्ता,उटगी-बेळोंडगी रस्ता या रस्त्याची गेल्या अनेक दशकापासून दुरूस्ती झालेली नाही.

 

हे सर्व रस्ते स्थानिक गावे,वाड्यावस्त्यांना जोडणारे आहेत.शेती, जवळच्या गावासह शहरांना जाण्यासाठी नागरिकांना हे रस्ते अत्यंत महत्वाचे आहेत.त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती होणे गरजेची आहे.आपण स्व:ता लक्ष घालून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यांना मंजूरी मिळवून द्यावी,अशी मागणी जमदाडे यांनी निवेदनात केली आहे.
Rate Card
जत तालुक्यातील रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूरी द्यावी,या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.