जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट 8.11 टक्केवर असल्याने जिल्हाधिकारी यांचा जूना आदेशाला 28 जून पर्यंत कायम करण्यात आला आहे.शनिवार,रविवार जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद राहणार आहेत.
जिल्ह्यातील कोरोना बाधित आकडा कमी होत असल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यात स्तर तीनमध्ये जिल्हा गेल्याने सकाळी सात ते सायकांळी 4 वाजेपर्यत अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली होती.त्यात शनिवार,रविवार दुकाने बंद ठेवण्याचे नमूद केले होते.
त्यानुसार जतसह तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील.त्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून गजबजलेल्या बाजार पेठा दोन दिवस पुन्हा लॉकडाऊन राहणार आहेत.