सांगोला : फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एम.एच.सीईटी,नीट मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती.बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थी जीवनाला कलाटणी देणारे वर्ष समजले जाते.बारावी नंतर करिअर निवडताना योग्य दिशा मिळणे गरजेचे असते,योग्य तज्ज्ञ मार्गदर्शनाची विद्यार्थ्यांना गरज असते.
कोरोना पश्चात करिअरचे चित्र कशाप्रकारे बदलत आहे? कोणत्या शाखेसाठी किती महत्त्व आहे? विशिष्ट करिअरसाठी नेमके कशाप्रकारे तयारी करायची? असे अनेकविध प्रश्न पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात पडलेले असतात, यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती.