जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्रातील आदर्श व अग्रणी पतपेढी महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त शिवकृपा पतपेढीचा 40 वा वर्धापन दिन संस्थेच्या सर्व 100 शाखामध्ये साजरा करण्यात
आला.सोलापूर विभागातील जत शाखा कार्यालयात वर्धापन दिन कार्यक्रमास एस.आर.व्ही.एम.हायस्कूलचे माजी प्राचार्य प्रमोद पोतनीस सर, गणेश पतसंस्थे चेअरमन बसवराज हिट्टी, निवृत्त वन अधिकारी संभाजी तुराई, शिवशंभो निधीचे चेअरमन लक्ष्मण बोराडे सर, शेगांवचे उपसरपंच सचिन बोराडे, व्यवसायीक अतुल मोरे, शिवाजी माळी, रमेश माळी, महांतेश मोगली, अँड. अजित दुधाळ व विविध क्षेत्रातील मान्यवर
उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री पोतनीस सर यांनी संस्थेचे संस्थापक कृष्णा शेलार व संचालक मंडळ यांच्या दुरदृष्टीने 40 वर्षापुर्वी पतपेढीची निर्मिती सर्वसामान्यांची अर्थवाहीनी झालेली असून त्या माध्यमातुन आर्थिक जिवनमान उंचावण्याची महंत कार्य संस्था करीत आहे, बसवराज हिट्टी यांनी संस्थेच्या अत्याधुनिक शिवम पे सेवेचा व तसेच
कर्मचारी प्रतिनिधी यांचा गौरव आपल्या मनोगतात व्यक्त केली.
यावेळी विविध मान्यवरांनी संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा देवून 5,000 कोटींचा संमिश्र व्यवसाय संस्था पार करेल असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, प्रास्ताविक पर्यवेक्षक रामचंद्र भोसले यांनी केले, शाखाधिकारी ज्ञानदेव बुधे यांनी संस्थेची माहिती आढावा सादर करून स्वागत व आभार मानले.
जत येथे शिवकृपा पतपेढीचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.