पाणी द्या, अन्यथा थेट कर्नाटकात जाऊ | – जत तालुका पाणी संघर्ष समितीचा सरकारला इशारा
जत,संकेत टाइम्स : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकात घेऊ ही घोषणा केल्यानंतर राज्यभर राजकर्त्यांना जाग आली आहे.जत तालुका महाराष्टात आहे.हे सर्वांच्या प्रतिक्रियेवरून दिसते आहे,मात्र आता म्हैसाळ विस्तारित अथवा अन्य पाणी योजनेतून पाणी दिले तरचं आम्ही महाराष्ट्रात राहू अन्यथा कोणत्याही एनओशी शिवाय पाणी देणाऱ्या कर्नाटकात जाऊ असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बोम्मईच्या दाव्यानंतर जत तालुक्यातील गावकरी आक्रमक झाले आहेत.आम्ही पाण्यासाठी गेली तीन दशके आम्ही पाण्यासाठी आक्रोश करतोय,त्याकडे दुर्लक्ष केले.आता महाराष्ट्रातील राजकर्त्यांना जाग आल्याचाही त्यांनी आरोप केला. ‘पाणी द्या, अन्यथा थेट कर्नाटकात जाऊ’असा इशाराही जत तालुका पाणी कृती समितीचा सरकारला इशारा दिला आहे. ‘आता NOCची वाट पाहणार नाही, थेट कर्नाटकात जाणार असेही ते म्हणालेत.
