ग्रामपंचायत निवडणूक,उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत वाढवावी | – प्रकाशराव जमदाडे

0
जत,संकेत टाइम्स : राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीची धामधूम सुरू असून अर्ज भरण्यापासून जातीच्या दाखल्यापर्यत सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहेत.राज्यातील ७७५१ तर जत तालुक्यातील तब्बल ८१ गावांच्या निवडणूकाही एकाचवेळी होत आहेत.राज्यभरातही गावांची मोठी संख्या आहे.त्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका अत्यंत अटीतटीच्या होत असतात.

 

निवडणूकीसाठी अर्ज भरणारे उमेदवारही मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर ताण असल्याने सातत्याने त्याचा सर्व्हर डाऊन होत आहे.परिणामी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना मोठा फटका बसत असून अर्ज भरण्याचा कालावधीही कमी आहे. सर्व्हर डाऊनची परिस्थिती अशीच राहिल्यास इच्छुक उमेदवार निवडणूकीस मुकण्याची शक्यता असल्याने निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आणखीन २ दिवस वाढवावी,अशी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी केली आहे.

 

जमदाडे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत  २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत आहे.पाच दिवसात अर्ज दाखल करणे अनिवार्य आहे. राज्यातील ७७५१ गावांमध्ये निवडणूका आहेत.त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या प्रचंड आहे.उमेदवारांना जातीचे दाखले,व उमेदवारी अर्ज भरणे जिकिरिचे होणार आहे.सतत ऑनलाइन पोर्टलचे सर्व्हर डाऊन होत असल्याने अर्ज भरण्यासाठी सेतु केंद्र,ऑनलाइन सेंटरवर रात्रभर गर्दी होत आहे,असून ताटकळत बसावे लागत आहे.इच्छुक उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने अर्ज भरण्याची मुदत आणखीन २ दिवस वाढवावी,अशी मागणी जमदाडे यांनी केली आहे
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.