मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून म्हैसाळ विस्तारित योजना १९००,पाणी योजना २०० कोटी निधीची घोषणा | – योगेश जानकर ; एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील सीमावर्ती भागातील गावांतील म्हैसाळ विस्तारित सिंचन योजना,पिण्याचे पाणी,रस्ते,आरोग्य,शैक्षणिक, उद्योगासह विकास योजना गतीने राबविल्या जातील,तसे संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथील बैठकीत दिले असल्याची माहिती,बाळासाहेबाच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख योगेश जानकर यांनी दिली.
जानकर म्हणाले,सीमावर्ती गावांनी यापुढे कुठेही जाण्याची गरज नाही.
राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील विकासासाठी आता थेट लक्ष घातले आहे.आम्ही गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने जतचे प्रश्न त्यांच्याकडे मांडत आहोत.दोन दिवसापुर्वी जतच्या शिष्टमंडळासह आम्ही भेटून समस्या मांडल्या होत्या.

 

सिमाभागातील गावासंदर्भात आज (ता.२)तातडीने मुंबईत बैठक घेण्यात आली.या बैठकीत महत्वपुर्ण असणाऱ्या म्हैसाळच्या विस्तारित योजनेसाठी १९०० कोटी,तसेच या भागातील काही गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी मंजूरीच्या अतिंम टप्यात असलेल्या पाणी पुरवठा योजनेसाठी २०० निधी देण्याचे घोषित केले आहे.पिण्यासाठी असणाऱ्या पाणी योजना वर्षाच्या आता पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच विस्तारित म्हैसाळ योजनेच्या मंजूरीची फाईल येत्या २० डिसेंबरच्या कँबिनेट बैठकीत आणण्याचे आदेश दिलेत.जानेवारीमध्ये त्या योजनेला मंजूरी मिळणार आहे.विशेष म्हणजे हि योजना दिड वर्षात पुर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिलेत.

 

विशेष करून या भागातील मराठी शाळा,रिक्त शिक्षक संख्येसह शैक्षणिक  सुविधेसाठी तातडीने कारवाई करण्याचे आदेश संबधित विभागाला ‌मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्याची रिक्त पदे,सुविधा उपलब्ध करण्याबाबतही त्यांनी सुचना दिल्या आहेत.रस्त्यासाठी असणाराही निधी तात्काळ देण्याचे संबधित विभागाला सांगितले आहे.कर्नाटककडून यामुळे सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. कोणतेही गाव यापुढे वचिंत राहणार नाही,असे आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दिल्याचेही जानकर यांनी सांगितले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.