संखमध्ये विजेच्या ठिनग्यापडून ऊसाला आग 

0
संख,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील संख येथील तुकाराम बाबा महाराज यांचे तीन एकर ऊसाला विजेच्या तारेचा स्पर्श होऊन ठिणगी पडल्याने आग लागून जळून खाक झाली आहे.

 

याबाबत माहिती अशी की,संख गावापासून दोन किलोमीटर अंतरावर मंगल कार्यालयाचे उत्तर बाजूस तुकाराम बाबा महाराज यांचे सर्वे नंबर ३ मध्ये तीन एकर ऊस लागण केली होती.या शेतावरून महावितरणच्या गावठाण व शेतीला वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्या गेल्या आहेत.
दुपारी साडेबारा वाजण्याच्या‌ सुमारास सुसाट वाऱ्यामुळे तारेचा एकमेकाला घर्षण होऊन ठीणगी पडल्याने ऊसाला आग लागली.त्यात मोठे नुकसान झाल्याचे तुकाराम बाबा यांनी सांगितले.गाव कामगार तलाठी व उमदी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पाहणी करून पंचनामा केला आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.