सांगोला: विद्यार्थ्यांची हजेरी जर १०० टक्के असेल तर त्यांच्या अपयशाचे प्रमाण हे नगण्य होईल त्यामुळे पालकांनी देखील आपल्या पाल्याच्या हजेरीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन फॅबटेक पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा. शरद पवार यांनी केले.डिप्लोमा प्रथम वर्ष विभागाच्या पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते .
पुढे बोलताना प्राचार्य पवार म्हणाले कि महाविद्यालया मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फॅबटेक पॉलिटेक्निक कायम कटिबद्ध आहे.प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख प्रा अनिल वाघमोडे यांनी , पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये असणारा सुसंवादाचा त्रिकोण पूर्ण झाला तरच विद्यार्थी प्रगती करू शकतो असे मत मांडले .
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती मध्ये सर्वात महत्वाचा वाटा हा स्वतःविद्यार्थ्यांचाच आहे हे पटवून देताना अकॅडेमिक को ओर्डिनेटर प्रा तानाजी बुरुंगले यांनी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल आणि युनिट टेस्ट वर भर देण्याचे आवाहन केले . यावेळी पालक प्रतिनिधी श्री संतोष साखरे व सौ अनिता खटकाळे व्यासपीठावर उपस्थित होते
प्रारंभी १०० टक्के हजेरी असणाऱ्या व युनिट टेस्ट मध्ये उज्वल यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्प गुछ देऊन सत्कार करण्यात आला .पालक सौ राणी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. संगीता खंडागळे यांनी व आभार प्रदर्शन प्रा वैशाली मिस्कीन यांनी केले.