सांगली : कवठेमहाकांळ तालुक्यात जर्शी गायी चोरणाऱ्या टोळीला कवठेमहाकांळ पोलीसांनी जेरबंद केले आहे.संदिप भारत पाटील वय २०,मारूती दादासो लिंगले वय २२ दोघे रा.कोगनोळी असे अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत.
कवठेमहाकांळ तालुक्यात गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या दारातून जर्शी गायी चोरीच्या घटना घडल्या होत्या.त्या पार्श्वभूमीवर कवठेमहाकांळ पोलीसांनी चोरट्याचा शोध सुरू केला होता.
दरम्यान पोलीस हवलदार सुभाष पडळकर व विठ्ठल सानप यांना कोंगनोळी येथील संदिप पाटील व मारूती लिंगले यांनी जर्शी गायी चोरी केलेल्या आहेत.त्यानुसार संशयिताकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे ४ लाख रूपये किंमतीचे २ छोटा हत्ती वाहने,व चोरी गेलेल्या २ लाख रूपये किंमतीच्या ४ जर्शी गायी मिळून आल्या आहेत.
संशयिताकडे कसून तपास सुरू असून आणखीन काही गायी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली. संशयितांना न्यायालयात उभे केले असता २ दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.अधिक तपास हवलदार सुभाष पडळकर करत आहेत.
कोंगनोळी येथे पकडलेेले जर्शी गायी चोरी दोन संशयित व मुद्देमाल