तात्पुर्ते मायथळ पासून म्हैसाळचे पाणी सोडा | – प्रकाशराव जमदाडे | मंत्री उदय सामंत यांच्याकडे मांडल्या मागण्या

0
जत,संकेत टाइम्स : जत दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांची गुडडापुर येथे भेट घेऊन जत तालुक्यातील प्रश्नांची सोडवणूक करावी या मागणीचे निवेदन जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी दिले.

 

निवेदनात म्हटले आहे की,तालुक्यातील वंचीत ६५ गावासाठी विस्तारित योजना अतिशय गरजेची आहे.तोपर्यंत मायथळ येथून फक्त २० कोटी खर्चून जर गुड्डापुर तलावात पाणी सोडले तर दोड:नाला व संख मध्यम प्रकल्प सायफन पद्धतीने भरणार आहेत.त्याचा फायदा पुर्व भागातील २० गावात पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी होणार आहे.याचा पाठपुरावा आम्ही २०२० पासून सांगली खाजदार संजयकाका पाटील व माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून करत आहे.त्याचे सविस्तर अंदाजपत्रक शासन स्तरावर आहे,आणि ही योजना ३ महिन्यात पूर्ण होऊ शकते.या योजनेला त्वरित मंजुरी द्यावी. तसेच जत मध्ये गायरान क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.तालुक्यात पंचतारांकित एमआयडीसी उभी करावी जेणेकरून तरुण बेरोजगार यांना काम मिळेल.हाताला ‌काम मिळाले तर दुष्काळी तालुक्यातील जनतेचे जीवनमन उंचावेल.

 

दरम्यान मंत्री सामंत यांनी जमदाडे यांची ही भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मांडू.जत तालुक्या बाबत शासन सकारात्मक विचार करून जनतेला न्याय देईल असे आश्वासन दिले.यावेळी रवींद्र आरळी सर,चंद्रकांत गुडोडगी,योगेश जाणकर,अंकुश हुवाळे ,चंद्रशेकर गोब्बी ,सरपंच प्रसाद पुजारी व डॉ.सार्थक हिट्टी उपस्थित होते.
जत तालुक्यातील विविध मागण्याबाबत निवेदन उद्योग मंत्री उदय सामंत यांना माहिती देताना प्रकाशराव जमदाडे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.