जत तालुक्यात सरपंच ३,सदस्य पदाचे २० अर्ज अवैध | उद्या माघारीनंतर लढती स्पष्ट होणार

0
6

सरपंच पदासाठी 2 हजार 418 तर सदस्य पदासाठी 14 हजार 24 अर्ज वैध

 

लांग ली : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२२ साठी  सरपंच पदासाठी २ हजार ४१८ अर्ज आणि सदस्य पदासाठी 14 हजार 24 अर्ज वैध ठरले आहेत. तर सरपंच पदासाठीचे 15 अर्ज आणि सदस्य पदासाठीचे 118 अर्ज  अवैध  ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.

जिल्ह्यातील 447 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण झाली असून छाननीनंतर  वैध ठरलेल्या अर्जांची माहिती अशी…

मिरज तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या ९९ प्रभागात २८८ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी १५० तर सदस्य पदासाठी ९८१ अर्ज वैध झाले आहेत.

अप्पर तहसील सांगली मध्ये ११ ग्रामपंचायतींच्या ५५ प्रभागात १६४ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी ६८ तर सदस्य पदासाठी ५८६ अर्ज वैध झाले आहेत.

तासगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या ९६ प्रभागात २८८ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी १५० तर सदस्य पदासाठी ८६१ अर्ज वैध झाले आहेत.

कवठेमहांकाळ तालुक्यातील  २८ ग्रामपंचायतींच्या ९९ प्रभागात २७० जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी १६६ तर सदस्य पदासाठी १ हजार २ अर्ज वैध झाले आहेत.

जत तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या २७४ प्रभागात ८२८  जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी ३८९ तर सदस्य पदासाठी २ हजार २४ अर्ज वैध झाले आहेत.

खानापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या  १४३ प्रभागात ४२४ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी १९७ तर सदस्य पदासाठी ९६२ अर्ज वैध झाले आहेत.

आटपाडी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या ८२ प्रभागात २५४ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी १४४  तर सदस्य पदासाठी ८४६ अर्ज वैध झाले आहेत.

पलूस तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या ६३ प्रभागात १८६ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी १३४ तर सदस्य पदासाठी ७६७ अर्ज वैध झाले आहेत.

कडेगांव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या १४७ प्रभागात ४४० जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी २५३ तर सदस्य पदासाठी १ हजार २९२ अर्ज वैध झाले आहेत.

वाळवा तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या २६२ प्रभागात ७८४ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी  ३३९ तर सदस्य पदासाठी २ हजार ४१३ अर्ज वैध झाले आहेत.

अप्पर तहसील आष्टा मध्ये १९ ग्रामपंचायतींच्या ७३ प्रभागात २२६ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी १०५  तर सदस्य पदासाठी ७४२ अर्ज वैध झाले आहेत.

शिराळा तालुक्यातील ६०  ग्रामपंचायतींच्या १९५ प्रभागात ५६४ जागावर निवडणूक होत असून सरपंच पदासाठी  ३२३ तर सदस्य पदासाठी १ हजार ५४८ अर्ज वैध झाले आहेत.

जत तालुक्यात सरपंच ३,सदस्य पदाचे २० अर्ज अवैध | उद्या माघारीनंतर लढती स्पष्ट होणार

अवैध नामनिर्देशन पत्रामध्ये मिरज तालुक्यात सदस्य पदाचे १३ अर्ज, अप्पर सांगलीमध्ये सरपंच पदाचा १ व सदस्य पदाचे ७,  तासगाव तालुक्यात सरपंच पदाचे ५ व सदस्य पदाचे 11,  कवठेमहांकाळ तालुक्यात सरपंच पदाचा १ सदस्य पदाचे २ , जत तालुक्यात सरपंच पदाचे ३ सदस्य पदाचे २० ,खानापूर तालुक्यात सरपंच पदाचे २ सदस्य पदासाठी १० , आटपाडी तालुक्यात सदस्य पदाचे ४,  पलूस तालुक्यात सदस्य पदासाठी ३ ,  कडेगाव तालुक्यात सदस्य पदासाठी ७,  वाळवा तालुक्यात सरपंच पदासाठी १ आणि सदस्य पदासाठी १७,  अपर आष्टा मध्ये सरपंच पदासाठी १ सदस्य पदासाठी ७ आणि शिराळा तालुक्यात सरपंच पदासाठी १ आणि सदस्य पदासाठी १७ अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here