जतला पंचतांराकित एमआयडीसी उभा करावी | उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रकाशराव जमदाडे यांनी दिले निवेदन

0
जत,संकेत टाइम्स :  जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे.त्यामुळे येथे उद्योगांना पोषक परिस्थिती असल्याने तालुक्यात पंचतांराकींत MIDC उभारावी अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
जत तालुका सांगली जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका असून एक ही बारमाही नदी नसलेने कायम दुष्काळ आहे. जत मध्ये कोणताही मोठा उद्योगधंदा व MIDC नसलेने अनेक तरुण बेरोजगारीवर मुंबई, पुणे या शहराकडे धाव घेत आहेत. सध्या जवळचं असलेल्या विजयपूर येथे अंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे.
जत तालुक्यामध्ये जवळपास १० ते १५ हजार एकर गायरान जमिन आहे. उद्योग धंद्यासाठी सहजचं उपलब्ध होऊ शकते.जत तालुक्याचा आर्थिक स्तर उंचवणेसाठी व दुष्काळाची दहाकता कमी करणेसाठी जत तालुक्यामध्ये पंचतंराकीत MIDC उभा करावी,असेही जमदाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.