बेवनूर(नागेश सोनूर) : बेवनूर ता.जत येथील लोकनियुक्त संरपचपदी सुभाष चंद्रकांत कांबळे व पोपट आण्णासो शिंदे हे एकमेव सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.तर ८ सदस्यासाठी आता दुंरगी सामना होणार आहे. तब्बल २७ उमेदवार सदस्य पदासाठी नशिब अजमावणार आहेत.
मसोबा शेतकरी विकास पँनेलचे उमेदवार असलेले संरपच पदाचे उमेदवार सुभाष कांबळे व सदस्य पदाचे उमेदवार पोपट शिंदे यांच्या विरोधातील अर्ज माघारी घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान संरपच पद बिनविरोध करण्यासाठी सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधीनी प्रयत्न केले.
सदस्य पदासाठी एकमत झाले नाही.त्यामुळे ८ सदस्य पदासाठी आता दुंरगी सामना रंगणार आहे.लोकनियुक्त संरपच विजयानंतर गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला.