डफळापूर शाळा क्र. 2 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
डफळापूर : डफळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा नं.2 मध्ये शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. शाळेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक अरविंद बंडगर यांच्या हस्ते हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेपंडित, दलितांचे कैवारी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले होते. म्हणून 6 डिसेंबर हा दिवस  महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना उपयुक्त अशी राज्यघटना लिहिली. खूप अभ्यास पूर्वक कलमे लिहिली. ते दिवसांतून 18 ते 20 तास अभ्यास करत होते.त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसारच आपल्या देशाचा कारभार चालतो. आपल्याला मतदानाचा अधिकार राज्यघटनेमुळे मिळाला आहे. त्यांनी अस्पृश्यता, सती प्रथा, अंधश्रद्धा इत्यादी वाईट प्रथा नष्ट करण्यासाठी काम केले.
Rate Card
दलितांना पाणी मिळवून देण्यासाठी चवदार तळे महाड येथे सत्याग्रह केला. दलितांना आपले हक्क व अधिकार मिळवून दिले. अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यूदिवस आपण महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतो.अशा शब्दांत शाळेतील शिक्षक अजय डोंगरे यांनी मार्गदर्शन केले.लहानपणा पासूनच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर खूप हुशार होते. त्यांचे वाचन चांगले होते. ते खूप शिकले एकदा वाचलेले ते विसरत नव्हते. आपण किमान त्यांच्यामधील एक तरी गुण घ्यावा व किमान दररोज एक तास तरी अभ्यास करावा,असे मनोगत शाळेचे मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले. यावेळी रेखा कोरे, अलका पवार, सुषमा चव्हाण, राजू केंगार, उद्योगरत्न संकपाळ,  दीपाली पट्टणशेट्टी, मोहिनी पाटील व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.