मिरजेत युवकाचा धारधार शस्त्राने खून

0
5

मिरज : मिरजेतीलसांगलीकर मळा येथे एका तरुणाचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋषिकेश बाळासाहेब जाधव (वय २५, रा घोरपडे, वाडा मिरज) असे मृत तरुणाचे नाव आहे. सांगलीकर मळा येथील रिकाम्या जागेत ऋषिकेशचा मृतदेह आढळला. याघटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

हल्लेखोरांनी ऋषिकेशचा धारधार हत्याराने निर्घुण खून करुन चेहर्‍याचा चेंदामेंदा केल्याचे निदर्शनास आले. याघटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक बसवराज तेली, डीवायएसपी अजित टिके, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह श्वानपथक व पोलिस पथकाने घटनास्थळी पाहणी केली. मृत तरुणाच्या चेहर्‍याचा चेंदामेंदा केल्याने पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेऊन कपड्यावरुन ओळख पटविली.

ऋषिकेशचा रात्रीच्या सुमारास खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या खूनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.दरम्यान,ऋषीकेश हा रिक्षा चालक व्यवसाय करत होता ओळख पटल्यानंतरमिरज शहर पोलिस ठाणे तील गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपींचा शोध लावला आहे.याप्रकरणी अक्षय विश्वनाथ पिसाळ (वय 28,रा.कमान वेस मिरज),दीपक हलवाई (रा.पाटील हौद मिरज) ह्या दोन संशयिताची नावे पोलीस तपासात निष्पन्न झाली आहेत.अक्षय पिसाळ याला मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तिघेजण दारू पीत झुडपात बसले होते.ऋषिकेश जाधव याने केलेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून डोक्यात दगड घालून ऋषिकेश जाधव याचा खून केल्याचे कबूली त्याने पोलीसांना दिली आहे.24 तासाच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here