राष्ट्रीय बसवदलाच्या अध्यक्षपदी संगमेश हिप्परगी,उपाध्यक्षपदी चिदानंद संती

0
जत : राष्ट्रीय बसवदलाच्या नूतन अध्यक्षपदी शरण संगमेश गिर्मला हिप्परगी तर उपाध्यक्षपदी शरण चिदानंद सिद्धप्पा संती यांची निवड करण्यात आली.खोजानवाडी (ता.जत) येथे बसवधर्म राष्ट्रीय बसवदलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात नवे पदाधिकारी निवडण्यात आले.नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार पूज्यश्री बसवानंद महास्वामीजी याच्यांहस्ते करण्यात आला.

 

यावेळी बोलताना बसवानंद महास्वामीजी म्हणाले,जीवनात आरोग्य संपत्ती सर्वश्रेष्ठ आहेत ते मिळविण्यासाठी प्रत्येकाने बसवतत्वाचा पालन केले पाहिजे. देशात शांतता हवी असेल तर प्रत्येकांनी नैतिकता संभाळणे महत्त्वाचे आहे.नैतिकतेने शांतता प्रस्थापित होते.जिथे शांतता आहे, तिथे ईश्वराचा वास असतो.खोजनवाडी गावात व्यसनाधीनांची संख्या कमी आहे,म्हणजे इथं कायकवे कैलास तत्त्वांचा पालन होत आहे.यामुळे प्रत्येकांचा आर्थिक प्रगती झालेल्या आहे.आरोग्य चांगल्या राहते हे आजच्या करोना सारख्या भयानक व्हायरसच्या संदर्भात अत्यंत गरजेचा आहे.

 

Rate Card
महादेवप्पा संती म्हणाले,पूज्य श्रीबसवानंद महास्वामीजी फक्त बसवतत्व मात्र प्रचार न करता त्याचाबरोबर निसर्ग उपचाराचा ट्रीटमेंट देतात.अनेक बरे न होणारे आजारातून अनेक रोगींना रोगमुक्त केले आहे.धारवाडहून आलेल्या अनेक शणांनी आपले मनोगत व्यक्त केले.मनगुंडीहून आलेल्या 300 च्या आसपास शरण शरणी व खोजनवाडीचे अनेक शरणांनी कार्यक्रमात सहभागी झाले होते.महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आले होते.ज्ञानदासोहा बरोबर अन्नदासोह सुद्धा यशस्वीरित्या पार पडले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.