खासदार पाटील यांच्या कार्यालयावर सोमवारी शेतकरी धडकणार

0
12



तासगाव : खासदार संजयकाका पाटील यांच्या मालकीच्या तासगाव व नागेवडी कारखान्याची ऊस बिले अद्याप मिळालेली नाहीत,म्हणून सोमवार (दि.21 जून) रोजी तासगाव येथील खा. संजयकाका पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.                        





खराडे म्हणाले,यापूर्वी याच ऊस बिल प्रश्नी 16 एप्रिल व सात जून रोजी आंदोलन करण्यात आली होती, मात्र आश्वासन देवून ही अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपयाही जमा झालेला नाही.अन्य कारखान्यांनी पहिला हप्ता दिलेला आहे.काही कारखान्यांनी दुसरा हप्ता ही दिलेला आहे,मात्र तासगाव व नागेवाडी कारखान्यात जानेवारी पासून  गाळप झालेल्या उसाचे बिल एक छदाम ही मिळाले नाहीत.हेलपाटे मारून मारून शेतकरी थकले आहेत.






मात्र बिल मिळायला तयार नाही.त्यामुळेच सोमवार दिनांक 21 जून रोजी तासगाव येथील खा.संजयकाका पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.हा मोर्चा शिवाजी पुतळ्यापासून सुरुवात होईल,तेथून गणपती मंदिर, सिध्देश्वर चौक,वंदे मातरम् चौकातून स्टँड मार्गे मार्केट यार्ड येथील कार्यालयावर जाईल या आंदोलनाचे नियोजन अशोक खाडे,राजेंद्र माने, दामाजी दुबाल,संदेश पाटील,शशिकांत माने,गुलाबराव यादव,जोतिरम जाधव,सचिन पाटील,महेश जगताप,





संदीप शिरोटी,माणिक शीरोते, बसवेश्वर पावटे,सिद्धू जाधव,प्रदीप लाड,शिवाजी भोसले,कुंडलिक बाबर, तानाजी सागर आदीसह अन्य करत आहेत.तरी या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी होवून आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन खराडे यांनी केले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here