जत,संकेत टाइम्स : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लोकार्पण व विस्तारित म्हैसाळ योजनेचे भूमिपूजन जानेवारीतच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. लवकरच त्याची तारीख जाहीर होईल,अशी माहिती सांगली जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संग्राम जगताप यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी मंत्री जानेवारी महिन्यात जतला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण व
विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचे उद्घाटन
या कार्यक्रमाला येणार आहेत.मंगळवार दि. ११ जानेवारी २०२३ रोजी जतच्या शिष्ठमंडळाशी उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली. त्यावेळेस उपमुख्यमंत्रीनी म्हैसाळ विस्तारीत योजनेचे टेंडर लवकरच काढणार आहे. त्यामुळे असे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी घेण्याचे उपमुख्यमंत्र्यानी मान्य केले.जत येथील शिष्ठ मंडळासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप, भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत, भाजपाचे शहर अध्यक्ष आण्णा भिसे, जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रविपाटील,माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, संतोष मोटे उपस्थित होते.
म्हैसाळ विस्तारित योजनेच्या कामालाही त्यामुळे गती येऊन कामाला लवकरच सुरुवात होईल अशी सकारात्मक चर्चा शिष्ठमंडळासोबत झाली. त्यामळे संपूर्ण तालुका सिंचनाखाली येणार असल्याने तालुक्यातील जनता आनंद व्यक्त करीत आहे.