संख : जत तालुक्यात 500 एकरवरती MIDC प्रकल्प उभारण्याची मुख्यमंत्री यांनी घोषणा केली तसेच जत तालुका विभाजन लवकरच होईल,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
जत तालुक्यातील शिंदे गटाच्या नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्याचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, जत तालुक्यातील विस्तारित म्हैसाळ पाणी योजनेची निविदा टेंडर प्रकिया शुरू झाली आहे.
उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या गावाच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणार आहोत.जत तालुक्यात 500 एकरवरती MIDC प्रकल्प उभारण्यात येईल,पत्रकार भवनही बांधू, जत तालुक्याचे विभाजनाचा प्रश्नही लवकरचं मार्गी लावू असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी उपस्थित जत तालुका संपर्क प्रमुख योगेश जानकर,जिल्हाप्रमुख आनंद पवार,महेंद्र चंडाळे युवा सेना जिल्हा प्रमुख मिलिंद कदम,सचिन काबळे, उपजिल्हा प्रमुख तम्मा कूलाळ, जत तालुका प्रमुख अंकुश हुवाळे,युवासेना तालुका प्रमुख प्रविण आवरादी,युवासेना तालुका प्रमुख सचिन मदने, श्रीमंत करपे,अण्णासाहेब गडदे,भीमराव पाटील,सुमित चव्हाण,सुभाष गोब्बी, मिरसाहेब मुजावर,आदिसह सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.