..अखेर म्हैसाळ विस्तारीत सिंचन प्रकल्पासाठी रु. ९८१ कोटीची निविदा प्रसिद्ध | – खासदार संजयकाका पाटील | संपूर्ण जत तालुका ओलिताखाली येणार

0

सांगली : जत तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरुपी संपवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्वाकांक्षी असणाऱ्या म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन प्रकल्पासाठी राज्य शासनाने मंजूरी दिल्यानंतर आज सुमारे रु. ९८१.६० कोटी रकमेची ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली असलेची माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.

खासदार संजयकाका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा क्र. १, २, ३ वरील पंपगृह, उर्ध्वगामी नलिका, टप्पा क्र. १, २ मधील जोड गुरुत्व नलिका व बोगदा कामे, आणि टप्पा क्र. १ व ३ वर वितरण कुंड या घटक कामांचे बांधकाम करणे, तसेच कामे पुर्ण झाल्यानंतर सर्व टप्प्यांवरील उर्ध्वगामी नलिका व गुरुत्व नलिकेचे ५ वर्षांकरीता परिचलन, देखभाल व दुरुस्ती करणे या कामांचा सदर निविदेमध्ये समावेश आहे.
Rate Card
ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता म. म. रासणकर यांच्या सहीने ही ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खा.संजयकाका पाटील यांनी आभार मानले.त्यांनी दिलेल्या शंब्दानुसार योजनेचे टेंडर काढल्याने जत तालुक्यात आंनदोत्सव साजरा करण्यात येत आहे.भविष्यात संपूर्ण जत तालुका ओलिताखाली ‌येणार आहे,असेही खा.पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.