जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्र व कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेली व सुमारे 15 शाखांच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेसाठी अविरतपणे तत्पर असलेली एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या करगणी (ता.आटपाडी) येथील शाखेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी आटपाडीचे युवक नेते अनिल पाटील, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पत्की, युवा उद्योजक विनायक मासाळ ,किरण पांढरे, दादासाहेब कचरे, उद्योजक सुखदेव कदम ,विश्वास सरगर, चेअरमन दत्तात्रय पाटील, उपसरपंच जब्बार मुल्ला ,पोलीस पाटील सत्यशील सवणे, नाथा सरगर ,उत्तम माने ,लक्ष्मण सरगर, भीमराव होनमाने, विजय सरगर ,समाधान ढोबळे ,दिनकर लांडगे , महादेव दिघे, संजय साळुंखे याचबरोबर विविध गावचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
इथे नांदते लक्ष्मी…
देते विश्वासाची हमी…
हे ब्रीद
या संस्थेच्या माध्यमातून ठेविदारांसाठी अनेक प्रकारच्या आकर्षक योजना देखील ग्राहकांना देऊ केलेल्या आहेत. एलकेपी दाम दीडपट ठेव योजना , दाम दुप्पट, दाम तिप्पट तसेच दाम चौपट ठेव योजना त्याचबरोबर अवघ्या शंभर दिवसाच्या ठेवीवर देखील ही संस्था सुमारे दहा टक्के व्याजदर देते. 46 ते 90 दिवसांच्या ठेवी करिता सात टक्के व्याजदर असून मुदतीच्या टप्प्याटप्प्याने व्याजदर वाढत जाऊन जेष्ठ नागरिक, अपंग , विधवा ,संत महंत, माजी सैनिक ,महिला इत्यादींसाठी 24 महिन्यांच्या पुढे तब्बल 13 टक्के इतका विक्रमी व्याजदर ठेवीकरिता ही संस्था देत आहे.
लहान मोठ्या व्यवसायिकांकरिता अत्यंत सुलभ व तात्काळ कर्ज या संस्थेकडून वितरित करण्यात येते. एटीएम, क्यू आर कोड ,आयएफएससी कोड तसेच भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्वीकारण्याची त्याचबरोबर चेक क्लिअरिंग ची सोय अशा अनेक प्रकारच्या सुविधा देखील या संस्थेकडून देण्यात येतात.
करगणी येथे एलकेपी मल्टीस्टेटचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.