सांगली : केंद्र शासन पुरस्कृत व जागतिक बँक अर्थसहाय्यित अटल भूजल योजना सांगली जिल्ह्यातील 95 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेची गाव पातळीवर माहिती होण्याकरीता व गावातील लोकांना योजनेचे व पाणी बचतीचे महत्व समजण्याकरीता गावनिहाय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
या अंतर्गत जत तालुक्यातील डफळापूर येथे दि. 16 जानेवारी 2023 रोजी प्रशिक्षणाचा शुभारंभ खासदार संजय पाटील यांच्याहस्ते तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त तथा प्रकल्प संचालक चिंतामणी जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सांगली चे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी दिली.