महाराष्ट्रातील शासकीय आश्रमशाळांची स्थीती चिंताजनक

0

गेल्या साडेपाच वर्षात आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2017 ते जुन 2022 या पाच वर्षे पाच महिन्यांच्या कालावधीत 680 विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आहेत ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.यात 22 वेगवेगळी कारणे असल्याचे सांगितले आहेत.यात सर्वाधिक मृत्यू आजारामुळे झाल्याचे सांगितले जाते.यावरून असे लक्षात येते की शासकीय आश्रम शाळांमधील आरोग्य सुविधा निकृष्ट दर्जाची असल्याचे स्पष्ट दिसून येते.आश्रम शाळांतील ही गंभीर बाब पहाता राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणी स्यू मोटो दाखल करून सरकारला जाब विचारला आहे.

 

 

आजारामुळे सर्वाधिक मृत्यू 282 असुन आतड्याचा आजार,मुत्रपिंड, निकामी होणे,श्वसनाचा त्रास, कॅन्सर,फिट येणे,टीबी,ॲनेमिया,सिकलसेल इत्यादी अनेक आजारांनी मृत्यू झाले आहेत.यामध्ये 150 मुली तर 132 मुलांचा समावेश आहे.शासकीय आश्रम शाळांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे मृत्यू होणे लाजिरवाणी बाब आहेच सोबत संपूर्ण महाराष्ट्राला वेदना देणारी आणि धक्का देणारी सुध्दा आहे.यावरून स्पष्ट होते की आश्रम शाळांमध्ये अत्यावश्यक सुविधांचा व आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव असल्याचे स्पष्ट दिसून येते.ठाणे, नाशिक, नागपूर व अमरावती विभागांतर्गत आश्रम शाळांमधुन झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू नाशिकमधील आश्रमशाळात 278, नागपूरमध्ये 171, ठाणे 150, अमरावती 80 अशा पध्दतीने आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते.

 

म्हणजेच मृत्यूच्या आकडेवारीत प्रथम क्रमांक नाशिकचा तर नागपूरचा दुसरा क्रमांक लागतो हि अत्यंत गंभीर बाब आहे.यावरून स्पष्ट होते की आश्रम शाळांमधील व्यवस्था अत्यंत ढासळलेली असल्याचे दिसून येते.शासनाच्या अंतर्गत जेव्हा आश्रम शाळा चालविल्या जातात तेव्हा त्याच पद्धतीने आश्रम शाळांमधील व्यवस्था किंवा सुविधा निटनेटक्या पध्दतीने सुसज्जी असायला हवी.फक्त आश्रम शाळा सुरू ठेवुन चालनार नाही.राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तालयाने शाळांसोबत आरोग्य सुविधा व इतर संपूर्ण सुविधा मुलांना प्रदान केल्या असत्या तर कदाचित साडेपाच वर्षात झालेली 680 पैकी काही मुला-मुलींचे प्राण वाचविण्यात अवश्य यश प्राप्त झाले असते.परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे 680 मुला-मुलींना आपला जीव गमवावा लागला ही अत्यंत वेदना देणारी बाब आहे.कारण आश्रम शाळा म्हटलं की आश्रम शाळा प्रशासनाची जबाबदारी असते की विद्यार्थ्यांना संपूर्ण सुरक्षा प्रदान करणे.परंतु आश्रम शाळांची योग्य हाताळणी न झाल्याने साडेपाच वर्षातील शासकीय आश्रम शाळांमधील मृत्यूचा आकडा वाढल्याचे दिसून येते.

Rate Card

 

सरकारला विनंती करतो की मुलं ही देवाघरची फुल असतात त्यामुळे संपूर्ण शासकीय आश्रम शाळांना आरोग्य सुविधांसह इतर संपूर्ण सुविधांनी सुसज्जीत करण्याची गरज आहे.यामुळे मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे आपल्याला अवश्य दिसून येईल.

रमेश कृष्णराव लांजेवार,नागपूर    मो.नं.9921690779

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.