स्व.पतंगराव कदम यांचे स्वप्न साकार | – विश्वजित कदम | श्रीपती शुगरचा पहिला गाळित हंगामाचा शुभारंभ
यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले,
माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम साहेबांचे श्रीपती शुगर हे एक स्वप्न होतंय. त्यासाठी माझ्या सहित आ.विक्रम दादा सावंत, महिंद्र आप्पा लाड यांनी प्रयत्न केले आणि ही स्वप्नपूर्ती होत आहे. या कारखान्यामुळे या भागातील ऊस तर गाळप होणारच आहे पण त्याचबरोबर या भागात रोजगार सुध्दा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

या कारखान्याची उभारणी १ ऑगस्ट २०२० रोजी स्वर्गीय डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांचे प्रेरणेतून झाली असून, कारखान्याची प्रती दिन गाळप क्षमता २५०० मे. टन इतकी आहे. तसेच, १२ मेगावॉट सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित होत आहे. त्याच बरोबर आगामी काळात केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणानुसार, आसवानी प्रकल्पसुद्धा कारखान्यामार्फत सुरु करण्यात येणार आहे.

