राष्ट्रीय महामार्गाचे काम पंधरवड्यापासून बंद,अर्धवट कामामुळे अडचणी

0
2



जत : शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग  या रस्त्याचे बांधकाम मुख्य शहरातून  सुरू आहे. मात्र, सदर काम गेल्या पंधरवड्यापासून बंद असल्यामुळे नागरिकांना वाहतुकीला मोठी अडचण होत आहे.रस्त्याचे मुख्य सीमेंट रस्त्याचे सिमेंटीकरण झाले आहे.मात्र त्या लगतचे फुटपाट,लाईट फिंटिग,गटारी,ब्लॉक बसविण्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे.





अनेक ठिकाणी अनेक महिन्यापुर्वू अर्धवट खोदकाम करून सुरू असलेल्या बांधकामामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

अशाने या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होताना दिसून येत आहे. या महामार्गावर स्टँड,मार्केट यार्ड, शाळा, बँका तसेच खाजगी रुग्णालयेसुद्धा आहेत. याच मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दी असते.





सध्या लॉकडाऊन असले तरी रस्त्यावर वाहतूक, बाजारपेठेत दुकानांची संख्या व गर्दी कमी होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही प्रमाणात का होईना वाहतूक तसेच बाजारपेठ खुली झाल्याने बाजारात चांगलीच गर्दी होत आहे.



यासोबतच खरीप पेरणीसाठी शेतकरी बियाणे, खत खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत येत आहेत. अशात या मार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसून येत आहे. मात्र, सदर काम हे अतिशय संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरात असलेल्या दुकानदारांना व्यवसाय करताना मोठी अडचण येत आहे. खोदकाम झालेल्या भागातील दुकानात जाण्या – येण्यासाठी असलेला रस्ता बंद पडल्याने परिसरातील नागरिकांमधून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे संबंधित विभागाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे इंचा ही कंत्राटदार कंपनी काम करण्यास टाळाटाळ करत आहे. सदर काम तत्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे.






मार्केट यार्डसमोरील व्यापारी संकुला समोर पंधरा दिवसापासून असा बाजूचा रस्ता खोदुन ठेवला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here