जत : राष्ट्रीय स्त गाडगेबाबा, त्यांचे परमशिष्य, वैराग्यसंपन्न बागडेबाबा यांच्याच विचाराचा वारसा जपण्याचे काम करत आपण श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून राजकारणात विरहित समाजकार्य करत आहोत. कोणी निंदा करू किंवा स्तुती आपण आपले काम करत राहणे गरजेचे आहे. मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून प्रत्येकांनी समाजकार्य करा असे करत रहा असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती , श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले
सांगली येथे महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ सांगली, श्री संत गाडगे महाराज रजक (परीट) समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने १२ वा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. याच वेळी समाजाच्या गुणवतांचा सत्कार व वधू वर मेळावाही पार पडला. मेळाव्याचे उदघाटन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती , श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष भरत लोखंडे, दत्तात्रय डोंगरे, सावंता वाघमारे ,दिपक लोखंडे, दत्तात्रय क्षीरसागर,लॉन्ड्री संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक साळुंखे, जिल्हा महीला अध्यक्षा शर्मिलाताई शिंदे, कार्याध्यक्ष संजय साळुंखे, जिल्हा सचिव विजयराव खेडकर, जिल्हा युवा अध्यक्ष रोहन परीट, खजिनदार महेशराव निकम,कुमार गायकवाड, राजेंद्र पावसे, बबनराव माने, सुनिल ठोंबरे, महेश परिट, दिगंबर साळुंखे, गजेंद्र साळुंखे, सारिका भंडारे, सिद्धी विनायकराव शिंदे, संजय जांभळे, श्रीमती सुशिला काळे, सुर्यकांत परीट, महादेव परीट, जयसिंग परिट, शिवाजी परिट, सचिन शिंदे, दिलीप खेडकर, रविंद्र शिंदे,दिपक कदम, विजय बावडेकर, विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.
इस्लामपूर येथील मंडळाच्या महीला प्रदेश उपाध्यक्षा सुमन परीट यांना राष्ट्रीय आदर्श माता पुरस्कार, सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर साळुंखे , माजी अध्यक्ष अशोकराव शिंदे यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार , कै. हनुमंत राक्षे यांना मरणोत्तर राष्ट्रीय रजक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती सुनिता हणमंत राक्षे यांचा तसेच जिल्हा संपर्कप्रमुखपदी रवी यादव, शहर अध्यक्षपदी आकाश कदम , डॉ . प्रा .अरविंद साळुंखे, नुतन ग्रामपंचायत सदस्य दुर्गा परिट – मांगले यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील नुतन पदाधिकारी यांच्या निवडी व सत्कार करण्यात आला.
कोरोना,दुष्काळ, महापुर,जळीत घटना, अपघात, नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना घडल्यानंतर मदत नव्हे कर्तव्य म्हणून सर्वसामान्यांना मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य मानून काम करणे प्रत्येकांचे काम आहे. माणसाने माणूस म्हणून जगावे व दुसऱ्यांना ही सहकार्य करावे असे आवाहन तुकाराम बाबा यांनी केले. परीट समाजबाधवांच्या अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. समाजाने एकसंघ व्हावे व आवाज उठवावा. या लढ्याला आपण बळ देऊ अशी ग्वाही तुकाराम बाबांनी दिली.
यावेळी परीट समाजबांधवांनी आपल्या व्यथा व प्रश्न उपस्थित केले. वधू वर सूचक मेळाव्यालाही मोठी गर्दी झाली होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. राजाराम रसाळ सर (कराड), कै.विजय साळुंखे, कै. सुनिल साळुंखे (विटा) यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे आभार जिल्हा कार्याध्यक्ष संजय साळुंखे यांनी मानले.
तुकाराम बाबांनी जपला वारसा
कोरोना, महापूर, दुष्काळ, अपघात असो की नैसर्गिक आपत्ती तुकाराम बाबांनी कायम मदतीचा हात गरजवंताना दिला आहे. राष्ट्रीय स्त गाडगेबाबा, त्यांचे परमशिष्य, वैराग्यसंपन्न बागडेबाबा यांच्याच विचाराचा वारसा जपण्याचे काम तुकाराम बाबा करत असल्याचे प्रतिपादन संजय साळुंखे सह अनेक मान्यवरांनी व्यक्त करत बाबांच्या सामाजिक कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होवू याबसे आवाहनही केले.