विश्वनाथ शांत(महाराज) यांचे निधन

0
डफळापूर,संकेत टाइम्स : येथील श्री.काशी विश्वनाथ महादेव देवस्थानचे महाराज विश्वनाथ महारूद्र शांत यांचे शुक्रवारी वृद्धोपकाळाने निधन झाले.
डफळापूर येथील जिवंत समाधी असणाऱ्या काशी विश्वनाथ गुरूचे ते शिष्य होते,त्यांनाही अधात्माचे मोठे ज्ञान होते,त्यांच्याकडूनही अनेक शिष्यांनी दिक्षा घेतली होती.
शांत वाड्यातील काशी विश्वनाथ महाराज यांची समाधी व महादेव मदिंराचा जीर्णोद्धार करून सुंदर मंदिर बांधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
त्यांच्या‌ जाण्याने डफळापूरमधिल अधात्म क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
येथील श्री बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन अनिल शांत यांचे ते वडिल होत,त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,तीन सुना नांतवडे असा मोठा परिवार आहे.रक्षाविसर्जन रविवार २९ जानेवारीला सकाळी ८.३० वाजता होणार आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.