राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे खलाटीत शिबीर | बुधवारी दिग्विजय चव्हाण यांच्याहस्ते होणार उद्घाटन
जत,संकेत टाइम्स : येथील राजे रामराव महाविद्यालय जत च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचे खलाटी येथे बुधवार दि. १ ते मंगळवार दि. ७ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आल्याची माहिती प्र. प्राचार्य सुरेश पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की बुधवार दि. १ फेब्रुवारी २०२३ रोजी स.१० वा. शिबीराचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्याहस्ते होणार असून यावेळी बाजार समितीचे संचालक अभिजीत चव्हाण हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून संरपच सौ. लता देवकते तर युवानेते योगेश जानकर,माजी सभापती आकाराम मासाळ हे उपस्थित राहणार आहेत.
या निवासी शिबीरात स्वयंसेवक ग्रामस्वच्छता, रस्ते दुरुस्ती, वृक्षलागवड करणार आहेत. तसेच दररोज गटचर्चा, व्याख्यानमाला, विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन केले असून खलाटी व परिसरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी डॉ.राजेंद्र लवटे, प्रा. पुंडलिक चौधरी, प्रा.तुकाराम सन्नके यांनी केले. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम व नियोजन सरपंच सौ. लता देवकते, उपसरपंच कुमार नाईक, ग्रामसेवक जी.एस.खरमाटे, सर्व सदस्य, जेष्ठ नागरिक, तरूण मंडळे, अंगणवाडी सेविका, शिक्षक, शासकिय अधिकारी, कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, सैनिक व ग्रामस्थ करीत आहेत.