आटपाडीतील शेतकऱ्यांचा नादच खुळा | वीजचोरी अधिकाऱ्यांसमोर इंग्रजीतून मांडल्या समस्या

0
सांगली : आटपाडी तालुक्यातील य.पा.वाडी गावच्या एका शेतकऱ्याने खडाखड इंग्रजी बोलून वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर समस्याचा मालिक मांडत आंचबित केले. अनेक वर्षापासून वीज कनेक्शन महावितरण देत नसल्याने आकडा टाकून वीज घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले.
वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला इंग्रजी भाषेत आपली आगतिक मांडली. मात्र अधिकारी आणि शेतकरी यांच्यातील हि इंग्रजीतील संभाषणाची व्हिडिओ क्लिप मात्र सोशल मीडियावर चांगलीच व्हायलर झाली असून सध्या चांगलीच धुमाकूळ घालत आहे.आटपाडी तालुक्यामध्ये महावितरण विभागाची वीज चोरी रोखण्यासाठी पथके तपासणी करत आहेत. या थेट बांधावर जात शेती पंपासाठी होत असणारी वीजचोरी पकडण्यासाठी आटपाडी महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता सुनील पवार हे पथकासोबत आटपाडी तालुक्यातील य.पा वाडी गावी दुपारच्या दरम्यान वीज चोरी पकडण्यासाठी फिरत‌ होते.

संवादाचा व्हिडिओ पहा..
https://twitter.com/sansankettimes/status/1623554545472380929?t=sDYHJmiuHTXq4NncV6N_cQ&s=19
दरम्यान याच वेळी य.पा.वाडी गावचे रहिवासी असलेले वेताळ चव्हाण हे वयस्कर शेतकरी हे आपल्या शेतामध्ये होते…त्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपासाठी आकडा टाकून वीज घेतल्याचे पथकाला आढळून आले.
यावेळी वीजचोरी पकडण्यासाठी पथक आल्याचे समजले नंतर शेतकरी वेताळ चव्हाण यांनी पथकासोबत असलेले अधिकारी सहाय्यक अभियंता सुनील पवार याच्याशी इंग्रजी मधून संवाद साधत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अधिकारी सुनील पवार यांनीही शेतकरी चव्हाण यांच्याशी इंग्रजी मधून उत्कृष्ट संभाषण करत त्यांची बाजू ऐकून घेत वस्तुस्थिती विशद केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वेताळ चव्हाण यांना पहिल्यापासून इंग्रजी विषयाची आवड आहे. त्याचा इतिहास हा विषय आहे. पण इंग्रजीही त्यांना चांगलेच अवगत असल्याचे व्हिडिओतून दिसते.
यावेळी आगतिक झालेला शेतकरी आणि अधिकारी यांच्यात इंग्रजी मध्ये झालेले संभाषण पथकातील कर्मचारी यांनी रेकार्ड केले असून हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला असून समाज माध्यमातून याबाबत उलट सुलट प्रतिक्रिया समोर येत आहेत.माध्यमांनीही त्याला प्रसिध्दी देत वस्तूस्थिती समोर आणली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.